वेस्ट इंडिजवर 71 धावांनी विजय मिळवत भारताची मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी
वेस्ट इंडिजला आठवा धक्का, कीमो पॉल आऊट
वेस्ट इंडिजला सातवा धक्का, अॅलिन धावचीत
वेस्ट इंडिजला सहावा धक्का
वेस्ट इंडिज अर्धा संघ गारद, कायरन पोलार्ड बाद
एकाच षटकात कुलदीपचे दोन बळी, वेस्ट इंडिजला चौथा धक्का
वेस्ट इंडिजला तिसरा धक्का, डॅरेन ब्राव्हो बाद
वेस्ट इंडिजला मोठा धक्का, हेटमायर बाद
वेस्ट इंडिजला पहिला धक्का, शाई होप बाद
रोहित शर्माची धडाकेबाज फलंदाजी, भारताच्या 195 धावा
रोहित शर्माचे धडाकेबाज शतक
रोहितच्या षटकाराने भारताचे दीडशतक
लोकेश राहुलचे सलग दोन चौकार
भारताला दुसरा धक्का, रिषभ पंत आऊट
भारताला पहिला धक्का, शिखर धवन आऊट
रोहित शर्माचे 38 चेंडूंत अर्धशतक पूर्ण
जोडी जमली रे... भारत 10 षटकांत बिनबाद 83
* शिखर धवनला 28 धावांवर जीवदान
* सातव्या षटकात भारताचे अर्धशतक पूर्ण
* रोहित तळपला... फटकावला पहिला षटकार
* भारत 4 षटकांत बिनबाद 20
* भारताकडून रोहितने लगावला पहिला चौकार
* वेस्ट इंडिजचा अचूक मारा, भारत 3 षटकांत बिनबाद 11
* फ्री-हिटवर फटकेबाजी करण्यात धवन अपयशी
* दुसऱ्या षटकात मिळाली भारताला पहिली फ्री-हिट
* ओशेन थॉमसचा भेदक मारा, पहिले षटक निर्धाव
* भारताच्या गोलंदाजांनी कसा केला सराव, पाहा हा व्हिडीओ
तब्बल 24 वर्षांनंतर लखनऊमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना होत आहे. या सामन्यासाठी स्टेडियमचा लूक बदलण्यात आला आहे. आपल्या वाचकांसाठी स्टेडियमचा हा खास लूक...
लखनऊ, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्याला काही मिनिटांमध्ये सुरुवात होणार आहे. हा सामना दिवाळीच्या मुहुर्तावर खेळवण्यात येणार असल्याने मैदानात नेमके कोणते खेळाडू फटकेबाजी करणार याची उत्सुकता साऱ्यांनाच लागलेली आहे. हा सामना जिंकल्यास भारताला ट्वेन्टी-20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेता येईल. पण जर वेस्ट इंडिजने हा सामना जिंकला तर त्यांना मालिकेत 1-1 अशी बरोबरी करता येईल. त्यामुळे या सामन्याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
वेस्च इंडिजने नाणेफेक जिंकली असून त्यांनी भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे
असा आहे भारतीय संघ
वेस्ट इंडिजचा संघ