भारताला कमी लेखण्याची चूक केली-वकार

मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रफोर्ड मैदानावर १६ जून २०१९ ला खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाक संघ डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे ८९ धावांनी पराभूत झाला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 04:25 AM2020-06-20T04:25:49+5:302020-06-20T04:26:09+5:30

whatsapp join usJoin us
India was way too good Pakistan had no answers Waqar Younis on 2019 World Cup clash | भारताला कमी लेखण्याची चूक केली-वकार

भारताला कमी लेखण्याची चूक केली-वकार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : मागच्यावर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना कमी लेखण्याची घोडचूक झाल्याने भारताविरुद्ध सामना मोठ्या फरकाने गमवावा लागला होता, अशी कबुली पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि कोच वकार युनूस यांनी दिली.

मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रफोर्ड मैदानावर १६ जून २०१९ ला खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाक संघ डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे ८९ धावांनी पराभूत झाला होता. त्या लढतीत झालेल्या चुकांविषयी वकार म्हणाले, ‘पाकला वाटले की आधी गोलंदाजी घेत आम्ही भारताला लवकर गुंडाळू. मात्र भारताच्या आघाडीच्या फळीने शानदार फलंदाजी केली. नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेण्याचा पाकचा निर्णय चुकीचा ठरला. सुरुवातीला खेळपट्टी गोलंदाजांना मदत करेल, असा माझा कयास होता. भारताचे सलामीवीर लवकर बाद झाले की फलंदाजी कोसळेल, असा अंदाज होता. खेळपट्टी आणि हवामानदेखील आमच्या बाजूने नव्हते. भारतीय फलंदाजांनी दमदार फटकेबाजी करीत धावडोंगर रचला होता.’रोहित शर्माने १४० धावा करीत भारताला ५० षटकात ५बाद ३३६ धावा उभारून दिल्या. त्यानंतर पाकने पावसाचा व्यत्यय येईपर्यंत ४० षटकात ६ बाद २१२ अशी मजल मारली होती.

‘नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेणे मूर्खपणा ठरला. त्या खेळपट्टीवर आधी फलंदाजी घेत मोठ्या धावा उभारून दबदबा निर्माण करण्याची गरज होती. त्या दिवशी पाकच्या गोलंदाजांना प्रभावी कामगिरी करण्यात अपयश आले. दुसरीकडे भारताने शानदार कामगिरी केली.’

Web Title: India was way too good Pakistan had no answers Waqar Younis on 2019 World Cup clash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.