सिडनी : पुढील महिन्यात होत असलेल्या भारताविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेपुर्वी मी पुर्णपणे तंदुरुस्त होईल, असा विश्वास आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जॉन हेस्टिंग्स याने व्यक्त केला आहे. चारदिवसीय कौंटी सामन्यात वोरसेस्टरशरकडून ससेक्स विरुध्द खेळताना हेस्टिंग्सच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. यानंतर, त्याला मागील आठवड्यात आॅस्टेÑलियाला रवाना व्हावे लागले होते.
हेस्टिंग्सने आपल्या दुखापतीविषयी सांगितले की, ‘गेल्या काही दिवसांपासून माझ्या उजव्या टाचेमध्ये थोड्या वेदना जाणवत आहेत. त्यामुळे मला यावर अधिक लक्ष केंद्रीत करणे जरुरी होते. नक्कीच हा मोसम मोठा असून त्यात भारत दौराही आहे. त्यामुळे मला या दौºयाचा सहभाग होण्याची तीव्र इच्छा आहे. परंतु, त्याचवेळी माझ्या पायाला दुखापत झाली. काही दिवस आराम केल्यानंतर मी पुन्हा सरावाला सुरुवात करेल. आशा करतो की, घरच्या मैदानावरील व भारतीय दौºयातील एकदिवसीय मालिकेसाठी मी तंदुरुस्त असेल.’
हेस्टिंग्सने म्हटले की, ‘या प्रकारच्या दुखापतीतून सावरण्यासाठी तुम्हाला कधी कधी सहा आठवडे लागतात, तसेच काहीवेळा १२ आठवड्यांहूनही अधिक काळ लागतो. मात्र, मला झालेली दुखापत फारशी गंभीर नसून काही आठवड्यांतच मी मैदानावर पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे.’ (वृत्तसंस्था)
Web Title: India will be fit before the series against India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.