Join us  

भारतीय संघाचा पुढील पाच वर्षांचा कार्यक्रम ठरला; ३८ कसोटी खेळणार, १९९२नंतर होणार मोठा बदल

भारतीय संघाचा २०२३ ते २०२७ या कालावधीतील कसोटी मालिकांचा कार्यक्रम जवळपास ठरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 6:05 PM

Open in App

भारतीय संघाचा २०२३ ते २०२७ या कालावधीतील कसोटी मालिकांचा कार्यक्रम जवळपास ठरला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी होणारी कसोटी मालिका आता पाच सामन्यांची असणार आहे. १९९२ नंतर प्रथमच भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.  ICC's Future Tours Programme (FTP)नुसार मे २०२३ ते २०२७ अशा कालावधीत भारतीय संघ एकूण ३८ कसोटी सामने खेळणार आहेत. त्यापैकी सर्वाधिक १० कसोटी इंग्लंडविरुद्ध, तर ९ कसोटी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होतील. 

२०१८-१९मध्ये ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा भारतीय संघ हा आशियातील पहिला संघ ठरला होता आणि दोन वर्षांनंतर निराशाजनक सुरुवातीनंतही टीम इंडियाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली पुन्हा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. आता भारतीय संघ २०२४-२५ला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे आणि त्यानंतर २०२७च्या सुरुवातीला भारतात परतीची मालिका होणार आहे. या दोन्ही मालिका जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२३-२५ व २०२५-२७ च्या सर्कलचा भाग असणार आहेत.  

याशिवाय भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध २०२४च्या सुरुवातीला आणि २०२५मध्ये परदेशात इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या दोन मालिका खेळणा राहे. भारतीय संघ एकूण ३८ कसोटी सामने खेळणार आहेत. इंग्लंड सर्वाधिक ४२, ऑस्ट्रेलिया ४१ कसोटी सामने खेळतील. बांगलादेश ( ३४) व न्यूझीलंड ( ३२) हे आणखी दोन संघ जे ३० पेक्षा अधिक कसोटी खेळणार आहेत. पण, या आकड्यांमध्ये किंचितसा बदल होण्याची शक्यता आहे.  ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्याव्यतिरिक्त भारतीय संघ ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४मध्ये न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.    

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध इंग्लंडभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
Open in App