१७ ऑक्टोबरपासून यूएई व ओमान येथे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) नुकतंच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामना २४ ऑक्टोबरला होणार असून दोन्ही संघांचा हा स्पर्धेतील पहिलाच सामना आहे. त्यामुळे उभय संघांतील चाहते या सामन्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत. आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेचा इतिहास पाहता पाकिस्तानला एकदाही भारतावर विजय मिळवता आलेला नाही. पण, या सामन्याच्या आधी टीम इंडिया दोन तगड्या संघांविरुद्ध मैदानावर उतरणार आहे आणि ते सामने LIVE पाहता येणार आहेत.
T20 World Cup 2021: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सर्व संघांची झाली घोषणा; जाणून घ्या कोणाचा संघ तगडा!
बीसीसीआयनं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या भारताच्या संघात चार फलंदाज, दोन यष्टिरक्षक-फलंदाज, १ जलदगती अष्टपैलू, २ फिरकी अष्टपैलू, ३ फिरकीपटू व ३ जलदगती गोलंदाज आहेत. २०१७मध्ये आर अश्विन टीम इंडियाकडून अखेरचा ट्वेंटी-२० सामना खेळला होता आणि आता तो थेट वर्ल्ड कप खेळणार आहे. त्यामुळे मुख्य स्पर्धेपूर्वी टीम इंडिया इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या दोन संघांविरुद्ध सराव सामने खेळणार आहे. टीम इंडिया १८ ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्ध आणि २० ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल. इंग्लंडविरुद्धचा सामना सायंकाळी ६ , तर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना दुपारी २ वाजल्यापासून सुरू होईल आणि हे सामने Star Sportsवर लाईव्ह दाखवण्यात येणार आहेत. ( India will be playing a Warm Up game before WT20 against England on 18th October, 6.00pm and one against Australia on 20th October, 2.00pm. Both the games will be live on Star Sports.)
भारतीय संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी; राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर व दीपक चहर ( TEAM - Virat Kohli (Capt), Rohit Sharma (vc), KL Rahul, Suryakumar Yadav, Rishabh Pant (wk), Ishan Kishan (wk), Hardik Pandya, Ravindra Jadeja, Rahul Chahar, Ravichandran Ashwin, Axar Patel, Varun Chakravarthy, Jasprit Bumrah, Bhuvneshwar Kumar, Mohd Shami.)
भारतीय संघाचे वेळापत्रक
२४ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
३१ ऑक्टोबर - भारत वि. न्यूझीलंड, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
३ नोव्हेंबर - भारत वि, अफगाणिस्तान, अबु धाबी, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
५ नोव्हेंबर - भारत वि. ब गटाती अव्वल, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
८ नोव्हेंबर - भारत वि. अ गटातील उपविजेता, दुबई, सायंकाळी ७.३० वाजता
उपांत्य फेरीचे सामने -१० नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर
अंतिम सामना - १४ नोव्हेंबर
Web Title: India will be playing a Warm Up game before WT20 against England and Australia, know where you can watch live
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.