अॅडिलेड : आॅस्ट्रेलियामध्ये पहिला मालिकाविजय साकारण्यासाठी आमच्या संघाला मोठ्या भागीदारी कराव्या लागतील, असे मत भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने व्यक्त केले. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी रहाणेने आॅस्ट्रेलियाला प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे.रहाणेने मेलबोर्नमध्ये २०१४-१५ च्या मालिकेत विराट कोहलीसोबत २६२ धावांच्या भागीदारीचे उदाहरण देताना सांगितले, की आॅस्ट्रेलियाचे लक्ष केवळ भारताच्या स्टार फलंदाजांवर केंद्रित असल्यामुळे, अन्य फलंदाजांना दुसऱ्या टोकाकडून आपले काम करण्याची संधी मिळते. रहाणे म्हणाला, ‘प्रत्येक फलंदाजाचे काम संघासाठी योगदान देण्याचे आहे. आम्हाला पूर्वीच्या मालिकेप्रमाणे मोठ्या भागीदारी कराव्या लागतील. त्यामुळे आॅस्ट्रेलियात मालिकाविजय साकारण्यास मदत मिळेल. गेल्या दौºयात एमसीजीवर भागीदारीचा पूर्ण आनंद घेतला. मिशेल जॉन्सनचे लक्ष विराट कोहलीवर होते आणि दुसºया टोकाकडून मी नैसर्गिक खेळाचा आनंद घेतला. दुसºया टोकाला विराट बॅट व तोंडाने आक्रमक होता. त्यामुळे मला खेळावर लक्ष केंद्रित करण्यास व नैसर्गिक खेळ करण्यास मदत झाली. मी विराटच्या तुलनेत संयमी खेळतो. प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी असते. हा सांघिक खेळ असून विराटला याची कल्पना आहे.’दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या संघांविरुद्ध भारतीय फलंदाजांवर टीका झाली होती. येथे केवळ कोहलीने चांगली कामगिरी केली.स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्याविना आॅस्ट्रेलियन फलंदाजी कमकुवत मानली जात आहे. पण रहाणेच्या मते, मायदेशात खेळताना आॅस्ट्रेलियाचा दावा मजबूत राहील.रहाणे म्हणाला, ‘मायदेशात प्रत्येक संघ चांगला खेळतो आणि आॅस्ट्रेलिया मालिकाविजयाचा प्रबळ दावेदार आहे. त्यांना स्मिथ व वॉर्नर यांची उणीव भासेल, पण ते कमकुवत नाहीत. त्यांची गोलंदाजीची बाजू दमदार असून, कसोटी क्रिकेटमध्ये हे महत्त्वाचे आहे.’ (वृत्तसंस्था)>आफ्रिका, आॅस्ट्रेलिया दौ-यात चांगली सुरुवात आवश्यक असतेकाही टीका करतात, तर काही प्रशंसा करतात, पण कठीण समयी आम्हाला एकजूट राहावे लागेल. इंग्लंडमधील परिस्थिती आव्हानात्मक होती आणि इंग्लंडचे फलंदाजही संघर्ष करीत असल्याचे दिसून आले. अॅलिस्टर कुकला अखेरच्या कसोटी डावाव्यतिरिक्त मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे टीका किंवा प्रशंसा यावर लक्ष देण्याची गरज नाही. प्रत्येक मालिकेत नव्याने सुरुवात करण्याची गरज असते. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका दौºयातून आम्ही बोध घेतला आहे. इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, आॅस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये चांगली सुरुवात करणे आवश्यक असते. - अजिंक्य रहाणे
- Cricket Buzz»
- बातम्या»
- भारताला मोठ्या भागीदारी कराव्याच लागतील- अजिंक्य रहाणे
भारताला मोठ्या भागीदारी कराव्याच लागतील- अजिंक्य रहाणे
आॅस्ट्रेलियामध्ये पहिला मालिकाविजय साकारण्यासाठी आमच्या संघाला मोठ्या भागीदारी कराव्या लागतील, असे मत भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने व्यक्त केले.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 4:24 AM