दुबई : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आता खूपच रंगत वाढली आहे. अशा परिस्थितीत भारताला आपली दावेदारी मजबूत करण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि नंतर मायदेशी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भरीव कामगिरी करावी लागणार आहे. भारत आयसीसी पुरुष कसोटी सांघिक क्रमवारीत ११४ रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलिया ११६.४६ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. न्यूझीलंडचे ११६.३७ गुण आहेत आणि ते ऑस्ट्रेलियाच्या खूप जवळ आहेत. ते वेस्ट इंडीजविरुद्ध दोन्ही कसोटी सामन्यात डावाच्या अंतराने मिळविलेल्या विजयानंतर २०२१ मध्ये होणाऱ्या आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. न्यूझीलंडने जर २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानला २-० ने नमवले, तर त्यांचे ५ मालिकेत ४२० गुण होणार आहेत. त्यामुळे भारताला आठ कसोटी सामन्यात ५ अथवा ४ विजय आणि तीन सामने अनिर्णीत ठेवण्याची आवश्यकता असेल. भारताला हे सर्व सामने तुल्यबळ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध खेळायचे आहेत. ऑस्ट्रेलिया नंबर एकवर आपली आघाडी मजबूत करू शकेल अथवा न्यूझीलंडसाठी अव्वल स्थानी पोहोचण्याचा मार्ग प्रशस्त करू शकतो. कोविड-१९ मुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील व्यत्ययानंतर आता अंतिम यादी टक्केवारी गुणांनुसार निश्चित होईल.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- भारताला ऑस्ट्रेलिया, इंग्लंडविरुद्ध चांगले खेळावे लागणार
भारताला ऑस्ट्रेलिया, इंग्लंडविरुद्ध चांगले खेळावे लागणार
दुबई : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आता खूपच रंगत वाढली आहे. अशा परिस्थितीत भारताला आपली दावेदारी मजबूत ...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 12:58 AM