भारतात पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत आणि त्यामुळे इंडियन प्रीमअर लीग २०२४ ( IPL 2024)चा एप्रिल किंवा मे महिन्यातील टप्पा दुसऱ्या देशात खेळवण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. २००९ च्या निवडणुकीमुळे आयपीएल भारताबाहेर खेळवण्यात आली होती, परंतु आयपीएलचे अध्यक्ष अरुण सिंग ठाकूर हे २०२४ची आयपीएल भारतातच आयोजित करण्याबाबत आशावादी आहेत.
जागरणने दिलेल्यावृत्तानुसार, अरुण ठाकूर म्हणाले की, ''लोकसभा निवडणुकीचा आयपीएलवर कोणताही परिणाम होणार नाही.'' ही ट्वेंटी-२० लीग जगातील सर्वात श्रीमंत लीग आहे आणि तिच्या स्टेकहोल्डर्स आणि BCCI साठी मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा मिळवून देते. बोर्डाने यावर्षी एप्रिल आणि मे महिन्या दरम्यान आयपीएल सामावून घेण्यासाठी वर्ल्ड कप पुढे ढकलला.
आयपीएल २०२४ भारतात आयोजित करण्याची शक्यता खूप जास्त आहे कारण बीसीसीआयकडे स्पर्धेसाठी शहरांची निवड करण्यासाठी पुरेसा वेळ असेल. जर आयपीएल २०२४ भारतात आयोजित केले गेले नाही, तर BCCI कडे दक्षिण आफ्रिका आणि UAE हा पर्याय आहे.
सार्वत्रिक निवडणुकांमुळे IPL 2009 संपूर्णपणे दक्षिण आफ्रिकेत पार पडली. निवडणुकांमुळे IPL 2014 चा हंगाम अंशतः UAE मध्ये आयोजित करण्यात आला होता. यूएईमध्ये जवळपास 20 ते 25 सामने खेळले गेले. तसेच, 2020 मध्ये महामारीमुळे, IPL संपूर्णपणे UAE मध्ये आयोजित करण्यात आले होते. या दोन देशांना आयपीएलमुळे चांगला महसूल मिळतो. मात्र, आयपीएलचे अध्यक्ष अरुण ठाकूर यांनी पुढील वर्षी आयपीएल परदेशात खेळवण्याची इच्छा नसल्याचे सांगितले. त्यांनी भारतातच आयपीएल आयोजित करण्याची योजना सुरू केली आहे.