Join us  

भारताची ‘क्लीन स्वीप’कडे वाटचाल

हार्दिक पांड्याच्या पहिल्या कसोटी शतकानंतर चायनामन गोलंदाज कुलदीप यादवच्या अचूक माºयाच्या जोरावर भारताने रविवारी तिसºया व अखेरच्या कसोटी सामन्यात दुसºया दिवशी श्रीलंकेचा पहिला डाव स्वस्तात गुंडाळत त्यांना फॉलोआॅन स्वीकारण्यास भाग पाडले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 3:57 AM

Open in App

पल्लीकल : हार्दिक पांड्याच्या पहिल्या कसोटी शतकानंतर चायनामन गोलंदाज कुलदीप यादवच्या अचूक माºयाच्या जोरावर भारताने रविवारी तिसºया व अखेरच्या कसोटी सामन्यात दुसºया दिवशी श्रीलंकेचा पहिला डाव स्वस्तात गुंडाळत त्यांना फॉलोआॅन स्वीकारण्यास भाग पाडले. दुसºया डावात श्रीलंकेचा एक बळी घेत भारताने यजमान संघाला ‘क्लीन स्वीप’ देण्याच्या दिशेने वाटचाल केली.भारताचा डाव उपाहारानंतर १२२.३ षटकांत ४८७ धावांत संपुष्टात आला. पांड्याने ९६ चेंडूंना सामोरे जाताना ८ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने १०८ धावांची खेळी सजवली. त्याने उमेश यादवसोबत (नाबाद ३) अखेरच्या गड्यासाठी ६६ धावांची भागीदारी केली. पांड्या उपाहारानंतर लक्षण संदाकनच्या (५-१३२) षटकांत तिसºया चेंडूवर बाद झाला. श्रीलंकेच्या या चायनामन गोलंदाजाने सहाव्या कसोटी सामन्यात प्रथमच पाच बळी घेतले.प्रत्युत्तरात खेळताना श्रीलंकेचे फलंदाज सुरुवातीपासून संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसले. त्यांचा डाव केवळ ३७.४ षटकांत १३५ धावांत संपुष्टात आला. त्या वेळी श्रीलंका संघाला भारताची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी ३५२ धावांची गरज होती. भारतीय कर्णधार विराट कोहलीने यजमान संघाला फॉलोआॅन देण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने दुसºया दिवसअखेर दुसºया डावात १ बाद १९ धावा केल्या होत्या. श्रीलंका संघाला डावाने पराभव टाळण्यासाठी अद्याप ३३३ धावांची गरज आहे. दिमुथ करुणारत्ने (१२) व नाईट वॉचमन मलिंडा पुष्पकुमारा (०) खेळपट्टीवर आहेत. उमेश यादवने उपुल थरंगाचा (७) त्रिफळा उडवित भारताला दुसºया डावात पहिले यश मिळवून दिले.गाले व कोलंबोमध्ये मोठे विजय साकारणाºया भारताच्या वेगवान व फिरकी गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांच्या उणिवा चव्हाट्यावर आणल्या. मोहम्मद शमी (२-१७) आणि उमेश यादव यांनी नव्या चेंडूने गोलंदाजीची सुरुवात केली. कुलदीपने गोलंदाजांना अनुकूल स्थितीचा लाभ घेत १३ षटकांत ४० धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. आश्विनने २२ धावांत २ फलंदाजांना माघारी धाडले. श्रीलंकेच्या पहिल्या डावात कर्णधार दिनेश चंडीमल (४८) व निरोशन डिकवेला (२९) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली.त्याआधी, भारताने कालच्या ६ बाद ३२९ धावसंख्येवरून पुढे खेळताना ४८७ धावांची मजल मारली. वृद्धिमान साहा (१६) बाद झाल्यानंतर पांड्याने कुलदीपच्या (२६) साथीने आठव्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. दरम्यान, भारताने ११० व्या षटकात ४०० धावांचा पल्ला गाठला. कुलदीप बाद झाल्यानंतर पांड्याने मोहम्मद शमीच्या (८) साथीने २० धावांची भागीदारी करताना ६१ चेंडूंमध्ये वैयक्तिक अर्धशतक झळकावले. शमी माघारी परतल्यानंतर पांड्याने उमेश यादवच्या साथीने अखेरच्या गड्यासाठी ६६ धावांची भागीदारी करताना वैयक्तिक शतक पूर्ण केले. (वृत्तसंस्था)>फलंदाजी करताना वैयक्तिक विचार करीत नाही : पांड्यामाजी विश्वकप विजेते कर्णधार कपिल देव यांच्या तुलनेत दहा टक्केही कामगिरी करता आली तरी मला आनंद होईल, अशी प्रतिक्रिया भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्याने व्यक्त केली. निवड समिती अध्यक्ष एम.एस.के. प्रसाद यांनी हार्दिकने जर खेळावर लक्ष कायम ठेवले तर त्याच्यात कपिल देवप्रमाणे यशस्वी होण्याची क्षमता असल्याचे म्हटले आहे.श्रीलंकेविरुद्ध तिसºया कसोटी सामन्याच्या दुसºया दिवसाच्या खेळानंतर पत्रकार परिषदेत बोलताना पांड्या म्हणाला,‘माझे लक्ष निश्चितच खेळावर आहे. मी क्षमतेनुसार खेळण्यास उत्सुक आहे. कपिल देव यांच्या तुलनेत १० टक्के जरी कामगिरी करता आली तरी मला आनंद होईल.’भारतीय गोलंदाजांविरुद्ध विशेषत: फिरकीपटूंविरुद्ध फटक्यांची निवड चुकल्यामुळे आम्हाला झळ बसली. भारतीय संघाच्या ४८७ धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळताना श्रीलंका संघाचा पहिला डाव केवळ १३५ धावांत संपुष्टात आल्यामुळे तिलकरत्ने नाराज झाले. आमचे फलंदाज फिरकीपटूंना खेळताना चाचपडत असल्याचे दिसत होते, अशी प्रतिक्रिया श्रीलंका संघाचे फलंदाजी प्रशिक्षक हसन तिलकरत्ने यांनी व्यक्त केली.>धावफलकभारत पहिला डाव :- शिखर धवन झे. चंडीमल गो. पुष्पकुमारा ११९, लोकेश राहुल झे. करुणारत्ने गो. पुष्पकुमारा ८५, चेतेश्वर पुजारा झे. मॅथ्यूज गो. संदाकन ०८, विराट कोहली झे. करुणारत्ने गो. संदाकन ४२, अजिंक्य रहाणे त्रि. गो. पुष्पकुमार १७, रविचंद्रन आश्विन झे. डिकवेला गो. विश्व फर्नांडो ३१, वृद्धिमान साहा झे. परेरा गो. फर्नांडो १६, हार्दिक पांड्या झे. परेरा गो. संदाकन १०८, कुलदीप झे. डिकवेला गो. संदाकन २६, मोहम्मद शमी झे. व गो. संदाकन ०८, उमेश यादव नाबाद ०३. एकूण १२२.३ षटकांत सर्व बाद ४८७. गोलंदाजी : विश्व फर्नांडो २६-३-८७-२, लाहिरू कुमार २३-१-१०४-०, दिमुथ करुणारत्ने ७-०-२३-०, दिलरुवान परेरा ८-१-३६-०, लक्षण संदाकन ३५.३-४-१३२-५, मलिंडा पुष्पकुमारा २३-२-८२-३.श्रीलंका पहिला डाव :- दिमुथ करुणारत्ने झे. साहा गो. शमी ०४, उपुल थरंगा झे. साहा गो. शमी ०५, कुसाल मेंडिस धावबाद १८, दिनेश चंडीमल झे. राहुल गो. आश्विन ४८, अँजेलो मॅथ्यूज पायचित गो. पांड्या ००, निरोशन डिकवेला यष्टिचित साहा गो. कुलदीप यादव २९, दिलरुवान परेरा झे. पांड्या गो. कुलदीप यादव ००, मलिंडा पुष्पकुमारा त्रि. गो. कुलदीप यादव १०, लक्षण संदाकन झे. धवन गो. आश्विन १०, विश्व फर्नांडो त्रि. गो. कुलदीप यादव ००, लाहिरू कुमार नाबाद ००. एकूण ३७.४ षटकांत सर्व बाद १३५. गोलंदाजी : मोहम्मद शमी ६.५-१-१७-२, उमेश यादव ३.१-०-२३-०, हार्दिक पांड्या ६-१-२८-१, कुलदीप यादव १३-२-४०-४, रविचंद्रन आश्विन ८.४-२-२२-२.श्रीलंका दुसरा डाव (फॉलोआॅननंतर) :- दिमुथ करुणारत्ने खेळत आहे १२, उपुल थरंगा त्रि. गो. उमेश यादव ०७, मलिंडा पुष्पकुमारा खेळत आहे ००. एकूण : १३ षटकांत १ बाद १९. गोलंदाजी : मोहम्मद शमी ४-२-७-०, आर. आश्विन ६-४-५-०, उमेश यादव २-०-३-१, कुलदीप यादव १-०-४-०.