भारतीय संघानं ( India vs England 4th Test) चौथ्या कसोटीत डावानं विजय मिळवला आणि इंग्लंडविरुद्धची मालिका ३-१ अशी जिंकली. या विजयाबरोबरच टीम इंडियानं आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद ( ICC World Test Championship) स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित केला. १८ जूनला लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर भारत-न्यूझीलंड ( India vs New Zealand) असा अंतिम सामना रंगणार आहे. ICC World Test Championship Final from June 18th आर अश्विन, अक्षर पटेल यांचा 'पंच'; टीम इंडियाचा मालिकेत ३-१नं विजय
टीम इंडियाचा एक डाव व २५ धावांनी विजयIndia vs England, 4th Test : वॉशिंग्टन सुंदरच्या ( Washington Sunder) हुकलेल्या शतकानं सर्वांना वाईट वाटलं... ९६ धावांवर खेळत असताना समोर तीन फलंदाज होते, परंतु एकामागून एक तिघेही माघारी परतले. पण, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium) विजय मिळवून भारतानं मालिका ३-१ अशी खिशात घातली. इंग्लंडच्या पहिल्या डावातील २०५ धावांच्या प्रत्युत्तरात भारतानं ३६५ धावा करून १६० धावांची आघाडी घेतली. इंग्लंडचा दुसरा डाव आर अश्विन ( R Ashwin) आणि अक्षर पटेल ( Axar Patel) यांनी १३५ धावांवर गुंडाळला. अक्षर पटेलनं ४८ धावांत पाच विकेट घेतल्या, आर अश्विननंही ४७ धावांत पाच बळी टिपले.