India will tour Zimbabwe भारतीय क्रिकेट संघ एकामागून एक दौरे करताना दिसतोय.. आयपीएल संपल्यानंतर घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका झाली. त्यानंतर आयर्लंड दौरा अन् सध्या इंग्लंड दौरा सुरू आहे. त्यापाठोपाठ भारतीय संघ तीन वन डे व पाच ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजला जाणार आहे. तेथून आता ११,२१२ किमी लांब असलेल्या झिम्बाब्वेचा दौरा भारतीय संघ करणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. भारतीय संघ तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. अद्याप BCCI ने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. ही मालिका आयसीसी वन डे सुपर लीगचा भाग असणार आहे आणि १८ ते २२ ऑगस्ट या कालावधीत ती खेळवली जाणार आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने झिम्बाब्वेसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. भारत यजमान असल्याने वर्ल्ड कप २०२३मध्ये आधीच पात्र ठरला आहे. या महिन्यात इंग्लंड व वेस्ट इंडिज यांच्याविरुद्ध सहा वन डे सामने भारतीय संघ खेळणार आहेत, परंतु ते आयसीसी वन डे सुपर लीगचा भाग नाहीत. ''भारतीय संघाचा पाहुणचार करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,''असे झिम्बाब्वे क्रिकेटचे अधिकारी म्हणाले. १५ ऑगस्टला भारतीय संघ हरारे येथे दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून तीनही सामने येथेच खेळवण्यात येतील.
सहा वर्षांनंतर भारतीय संघ आफ्रिकन देशाच दौरा करणार आहे. २०१६मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ येथे तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळला होता. २७ ऑगस्टपासून आशिया चषक सुरू होणार असल्यामुळे यंदाच्या झिम्बाब्वे दौऱ्यावर ट्वेंटी-२० मालिकेचे आयोजन करण्यात आलेले नाही.
इंग्लंडविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका
पहिला सामना - ७ जुलै २०२२, एजीस बॉलदुसरा सामना - ९ जुलै २०२२, एडबस्टनतिसरा सामना - १० जुलै २०२२, ट्रेंट ब्रिज
इंग्लंडविरुद्धची वन डे मालिका
पहिला सामना - १२ जुलै २०२२, ओव्हलदुसरा सामना - १४ जुलै २०२२, लॉर्ड्सतिसरा सामना - १७ जुलै २०२२- ओल्ड ट्रॅफर्ड
भारताचा विंडीज दौरा
पहिली वन डे - २२ जुलैदुसरी वन डे - २४ जुलैतिसरी वन डे - २७ जुलैपहिली ट्वेंटी-२० - २९ जुलैदुसरी ट्वेंटी-२० - १ ऑगस्टतिसरी ट्वेंटी-२० - २ ऑगस्टचौथी ट्वेंटी-२० - ६ ऑगस्टपाचवी ट्वेंटी-२० - ७ ऑगस्ट
यानंतर श्रीलंका, झिम्बाब्वे व आशिया चषक अशा मालिका आहेत. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा आहेच.
भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक
23 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न27 ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी30 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ2 नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड6 नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न१३ नोव्हेंबरला अंतिम सामना