Join us  

रोहितच्या नेतृत्वात भारत आणखी एक विश्वचषक जिंकेल!

Nagpur : क्रिकेट ज्योतिषी नरेंद्र बुंदे यांचे भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 6:33 PM

Open in App

किशोर बागडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ २०२७ पर्यंत आणखी चमकदार कामगिरी करणार असून, या काळात आणखी एक विश्वचषक तसेच २०२३-२०२५ आणि २०२५-२०२७ या कालावधीत एकदा विश्व कसोटी चॅम्पियनशिपचे (डब्ल्यूटीसी) विजेते बनण्याची टीम इंडियाला संधी असेल,’ असे भाकीत प्रसिद्ध क्रिकेट ज्योतिषी नरेंद्र बुंदे यांनी केले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना बुंदे म्हणाले, ‘रोहितसह विराट कोहलीदेखील देशासाठी सरस कामगिरी करत राहील. विराटची १०० आंतरराष्ट्रीय शतकेदेखील लवकरच पूर्ण होऊ शकतात.’ रोहितच्या नेतृत्वात भारताने नुकताच टी-२० विश्वचषक जिंकला. त्याचवेळी रोहित आणि विराटसह रवींद्र जडेजाने टी-२० प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. वन-डे आणि कसोटी प्रकारात मात्र तिघेही खेळत राहणार आहेत.

सूर्या, राहुल, बुमराहचे भविष्य उज्ज्वलबुंदे म्हणाले, ‘रोहित, विराट, जडेजा यांची संघातील पोकळी कोण भरून काढेल? असा चाहत्यांना प्रश्न पडला आहे. या तिघांचे स्थान सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल आणि जसप्रीत बुमराह हे घेतील. हे तीन खेळाडू वन-डे आणि कसोटीतही भारतीय संघाचे भविष्य आहेत. प्रत्येकजण आपल्या कामगिरीचा ठसा उमटवणार आहे.’

शुभमन हा पुढचा कोहलीशुभमन गिल हा भावी विराट कोहली बनेल, असे सांगून ते म्हणाले, ‘विराटसारखेच ग्लॅमर शुभमल गिलच्या सभोवताली असणार आहे. तो तिन्ही प्रकारांत योगदान देत राहणार असल्याने विराटसारखे वलय गिलच्या सभोवताली निर्माण होईल,’ यात शंका नाही. दिग्गज क्रिकेटपटूंना टिप्स देण्यासाठी ख्यातीप्राप्त असलेले बुंदे यांनी आपण विराट, धोनी आणि सचिन यांच्याविषयी वेळोवेळी वर्तविलेली सलग सात भाकिते खरी ठरल्याचा दावा केला. त्यांनी वर्तविलेले अंदाज त्यावेळी माध्यमांनी प्रकाशित केले होते.

बुंदे यांचे खरे ठरलेले अंदाज असे :

  • विराट कोहली : - अनुष्कासोबत विवाह होणार (वर्ष २०१७), २०१९ लकी राहणार, विराटच्या नेतृत्वात विदेशात यश, विराट नंबर वन ब्रॅण्ड बनणार, २०१९ च्या विश्वचषकात वैयक्तिक यश, २०२३ मध्ये जोरदार पुनरागमन, विश्वचषक फायलन २०२४ ला यशस्वी फलंदाजी.
  • सचिन तेंडुलकर : - टेनिस एल्बोनंतर यशस्वी पुनरागमन, वन-डेत पहिले द्विशतक, २०११ चा वन-डे विश्वचषक खेळणार, २०१२ ला शतकांचे शतक गाठणार, २०१२ मध्ये निवृत्त होणार, ‘भारतरत्न’ मिळणार.
  • महेंद्रसिंग धोनी : - २००६ लकी ठरेल, पहिल्या आयपीएलमध्ये चेन्नई फायनल खेळेल, धोनीच्या नेतृत्वात २०११ ला विश्वविजेते बनू, २०१५ ला भारत उपांत्यफेरी गाठेल, फायनल मात्र हरणार, २०१९ ला चेन्नई संघ मुंबईविरुद्ध फायनल खेळेल, धोनी २०१९ चा वन-डे विश्वचषक खेळेल.
टॅग्स :ऑफ द फिल्डनागपूर