जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यात भारताने आफ्रिकेवर 63 धावांनी मात करत मालिकेचा अखेर गोड केला आहे. कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने २-१ अशा फरकाने जिंकली असली, तरीही कसोटी मालिकेत भारतीय गोलंदाजांनी केलेली कामगिरी आणि शेवटच्या कसोटी सामन्यातला विजय हा भारताला वन-डे आणि टी-२० मालिकेत महत्त्वाचा आहे. तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 63 धावांनी पराभव करत क्लिनस्वीप टाळला. मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांना बाद केलं. शमीने दुसऱ्या डावात पाच बळी घेतले तर बुमराह आणि इशांतने प्रत्येकी दोन बळी घेत त्याला उत्तम साथ दिली. एलगर अनो हाशिम अमलाने चिवट फलंदाजी करत भारतापुढे आव्हान निरामन केलं होतं. दोघांनी दमदार अर्धशतके ठोकत भारताचा विजय हिरावून नेहला होता. पण मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेला खिंडार पडलं. भारताने दिलेल्या 241 धवांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवशी आफ्रिकेची सुरुवात खराब झाली होती.
पण चौथ्या दिवशी आमला(52) आणि एल्गार(86) यांनी संयमी खेळी करत भारतापासून विजय हिसकावण्याचा प्रयत्न केला. ही जोडी चांगलीच जमली होती. दोघांमध्ये 121 धावांची भागीदारीही झाली. ही जोडी विजय घेऊन जाणार असे वाटत असतानाच आमला बाद झाला. आमलाने 54 धावांची निर्णायक खेळी केली. आमला बाद झाल्यानंतर आफ्रिकेच्या फलंदाजीला खिंडार पडले. एल्गारने एक बाजू लावून धरली पण त्याला योग्य ती साथ मिळाली नाही. आमला(54), एल्गार(86) आणि फिलेंडर (10) वगळता एकाही फलंजाला दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही. डिव्हिलर्स (6) डुप्लिसिस(2) डिकॉक (0) यांनी आपल्या लौकीकास साजेशी खेळी करता आली नाही. आफ्रिकेचे तीन फलंदाज 0 धावांवर बाद झाले.
दरम्यान, कसोटी मालिकेनंतर भारत आणि आफ्रिका यांच्यात ६ वन-डे आणि ३ टी-२० सामन्यांची खेळवली जाणार आहे. भारत आणि आफ्रिका यांच्यातला पहिला वन-डे सामना १ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे.