Join us

फायनल न खेळता या पठ्ठानं जिंकला गोल्डन बॉल; रचिनवर सचिनसारखी वेळ! गोल्डन बॅट जिंकली, पण...

ट्रॉफी हाती लागली. पण गोल्डन बॅट आणि गोल्डन बॉल पटकवण्याची  भारतीय संघातील खेळाडूंची संधी थोडक्यात हुकली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 00:28 IST

Open in App

India Wins Champion 2025 Trophy But Golden Bat And Ball Goes For New Zealand : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमध्ये ४ विकेट्सनं विजय नोंदवत विक्रमी जेतेपद पटकावले. भारतीय संघानं विक्रमी तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. ट्रॉफी भारतीय संघाच्या हाती लागली. पण गोल्डन बॅट आणि गोल्डन बॉल पटकवण्याची  भारतीय संघातील खेळाडूंची संधी थोडक्यात हुकली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

रचिनवर आली सचिनसारखी वेळ!

न्यूझीलंडच्या ताफ्यातील सलामीवीर रचिन रवींद्र सामनावीर पुरस्कारासह गोल्डन बॅटचा मानकरी ठरला. भारतीय वंशाचा रचिन रवींद्र याच्या नावात सचिन आणि द्रविड यांच्या नावाचा कॉम्बो आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत दमदार कामगिरी केल्यावर त्याच्यावरही सचिनसारखी वेळ आली. २००३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत सचिननं  गोल्डन बॅट जिंकूनही भारतीय संघाला वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावता आली नव्हती. अगदी तोच सीन रचिन रवींद्रच्या बाबतीत मिनी वर्ल्ड कप स्पर्धेत घडलाय त्याने सर्वाधिक धावा करत स्पर्धा गाजवली. त्याला गोल्डन बॅट मिळाली, पण ट्रॉफी मात्र टीम इंडियाने पटकावली.

भारताकडून अय्यरसह विराटला होती संधी, पण...

रचिन रविंद्र याने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील ४ सामन्यातील ४ डावात दोन शतकासह सर्वाधिक २६३ धावा केल्या. भारताविरुद्धच्या दोन मॅचेस सोडल्यात तर अन्य दोन्ही सामन्यात त्याने शतक झळकावले. भारताकडून श्रेयस अय्यरशिवाय विराट कोहलीला या सामन्यात मोठ्या खेळीसह गोल्डन बॅट पटकावण्याची संधी होती. पण ते मागे पडले. अय्यरनं ५ सामन्यातील ५ डावात २४३ धावा केल्या. फायनल सामन्यात अय्यर लयीत खेळला. जर त्याने आणखी २१ धावा काढल्या असत्या तर गोल्डन बॅट त्याच्या नावे झाली असती. विराट कोहलीनं ५ डावातील पाच सामन्यात २१८ धावा केल्या.  तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदााजंच्या यादीत पाचव्या स्थानावर राहिला. फायनलमध्ये त्याने फक्त एक धाव केली. इथं मोठी खेळी आली असती तर तोही या गोल्डन बॅटचा विजेता ठरला असता.

शमी, वरुणला मागे टाकत फायनल न खेळता या गोलंदाजाला मिळाला 'गोल्डन बॉल'

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्याला गोल्डन बॅट तर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला गोल्डन बॉलन सन्मानित करण्यात येते. भारताकडून मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती ही जोडी आघाडीवर होती. पण शेवटी बाजी मारली ते फायनल न खेळणाऱ्या मॅट हेन्रीनं. दुखापतीमुळे तो फायनलला मुकला. त्याने भारताविरुद्धच्या साखळी फेरीतील पाच विकेट्सच्या दमदार कामगिरीसह ४ सामन्यातील ४ डावात १० विकेट्ससह गोल्डन बॉलचा पुरस्कार पटकवला. वरुण चक्रवर्तीनं ३ सामन्यात ९ विकेट्ससह त्याच्या मागे पडला. मोहम्मद शमी आणि मिचेल सँटनर यांनी दोघांनी ५ सामन्यातील ५ डावात प्रत्येकी ९-९ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडचॅम्पियन्स ट्रॉफी २०२५भारतीय क्रिकेट संघमोहम्मद शामीवरूण चक्रवर्ती