जमैका - भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने सहजच विजय मिळवला. भारताने दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा संघ 210 धावांवर संपुष्टात आणला. त्यामुळे, 257 धावांनी विजय मिळवत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 2-0 ने कसोटी मालिका जिंकली. जमैकाच्या सबीना पार्क मैदानावर चौथ्या दिवशीच्या खेळावेळी आश्चर्यकारक घटना घडली आहे. वेस्ट इंडिजचे फलंदाज डरेन ब्राव्हो मैदानातून परतला होता. जमैकाच्या पर्यावरणातील बदल आणि तापमानामुळे ब्राव्होला अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे मैदानामध्ये फिजिओ आले आणि त्याला बाहेर घेऊन गेले होते.
हनुमा विहारीच्या कारकीर्दीतील पहिल्या शतकी खेळीनंतर जसप्रीत बुमराहच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपदमध्ये दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडीजचा पहिला डाव 47.1 षटकात 117 धावांत गुंडाळला. त्यामुळे भारताने तब्बल 299 धावांची भलीमोठी आघाडी घेत सामन्यावर घट्ट पकड मिळवली. त्यानंतर, फलंदाजीस आलेल्या टीम इंडियाने 168 धावांवर 4 गडी बाद असताना डाव घोषित केला. त्यामुळे वेस्ट इंडिजला 467 धावांचे लक्ष्य पार देण्यात आले होते.
भारताने 117 धावांत डाव गुंडाळूनही वेस्ट इंडिजला यजमानांवर फॉलोऑन लादण्याचा निर्णय घेतला नाही. भारताच्या 467 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजचे 45 धावांवर 2 गडी बाद झाले होते. चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजने खेळाला सुरुवात केली. मात्र, चौथ्या दिवशीही सामन्यावर भारतीय फलंदाजांचे वचर्स्व राहिले. भारताने 210 धावांतच वेस्ट इंडिजच्या सर्वच खेळाडू्ंना बाद केले. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात 257 धावांनी भारताने वेस्ट इंडिजवर विजय मिळवला. दुसऱ्या डावाता मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली. दोघांनीही प्रत्येकी 3 गडी बाद केले. तर, इशांत शर्माने 2 गडी तंबूत पाठवले. जसप्रीत बुमराहने केवळ 1 गडी बाद केला. दरम्यान, पहिल्या डावात बुमराहने 6 गडी बाद केले होते.
Web Title: India wins 'Test', West Indies win by 257 runs, Jadeja, Shami help India complete series sweep
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.