WTC Final 2021 : न्यूझीलंडला नमवून भारत जिंकेल डब्ल्यूटीसी फायनल - पेन

ब्रिस्बेन येथे पत्रकारांशी बोलताना पेन म्हणाला, ‘माझ्या मते भारत हा सामना सहजपणे जिंकेल. त्यासाठी मात्र भारतीय संघाला सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागेल.’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 05:30 AM2021-06-16T05:30:42+5:302021-06-16T05:31:12+5:30

whatsapp join usJoin us
India Wins WTC Final - Penn | WTC Final 2021 : न्यूझीलंडला नमवून भारत जिंकेल डब्ल्यूटीसी फायनल - पेन

WTC Final 2021 : न्यूझीलंडला नमवून भारत जिंकेल डब्ल्यूटीसी फायनल - पेन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मेलबोर्न : विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यात न्यूझीलंडला नमवून भारत विजेता होईल, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टिम पेन याने व्यक्त केला आहे.

ब्रिस्बेन येथे पत्रकारांशी बोलताना पेन म्हणाला, ‘माझ्या मते भारत हा सामना सहजपणे जिंकेल. त्यासाठी मात्र भारतीय संघाला सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागेल.’ पेनने भारत आणि न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वात संघाने २०१९ ला न्यूझीलंडचा ३-० ने फडशा पाडला होता. २०२० मध्ये मात्र भारताविरुद्धची मालिका पेनने १-२ ने गमावली होती. न्यूझीलंडने फायनलआधी इंग्लंडचा १-० ने पराभव केला. इंग्लंड संघ बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स, मोईन अली, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, यष्टिरक्षक बेन फोक्स यांच्याविना खेळला होता. न्यूझीलंड संघ चांगला होता, मात्र इंग्लंड संघ सर्वोत्कृष्ट नव्हता. ॲशेस मालिकेत आमच्याविरुद्ध ते सर्वश्रेष्ठ संघ खेळवतील,’  असे मत पेनने व्यक्त केले.

भारतीय संघात उमेशला स्थान, शार्दुल बाहेर
साऊथम्पटन : न्यूझीलंडविरुद्ध डब्ल्यूटीसी फायनलसाठी भारतीय संघ जाहीर झाला असून अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादव याला शार्दुल ठाकूरऐवजी पसंती देण्यात आली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या संघात उमेश, मोहम्मद शमी आणि हनुमा विहारी यांचे पुनरागमन झाले तर मयांक अग्रवाल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना बाहेर ठेवण्यात आले. स्थानिक मालिकेत इंग्लंडविरुद्ध ‘मॅचविनर’ ठरलेला अक्षर पटेल हादेखील बाहेर बसणार आहे.

भारतीय संघ 
भारतीय टीम : विराट कोहली (कर्णधार) शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज, रिद्धिमान साहा (यष्टिरक्षक), उमेश यादव आणि हनुमा विहारी.

न्यूझीलंड संघ जाहीर, विलियम्सनकडे नेतृत्व
साऊथम्पटन : भारताविरुद्ध १८ जूनपासून होणाऱ्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंड संघ मंगळवारी जाहीर करण्यात आला. या संघाचे नेतृत्व नियमित कर्णधार केन विलियम्सन करेल, अशी घोषणा मुख्य कोच गॅरी स्टीड यांनी केली. ढोपराच्या दुखण्यामुळे केन इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत खेळू शकला नव्हता. त्या सामन्यात बाहेर बसलेला बीजे वॉटलिंग हादेखील खेळणार आहे. ३२ वर्षांचा एजाज पटेल एकमेव फिरकी गोलंदाज म्हणून संघात असेल. 
न्यूझीलंड संघ 
केन विलियम्सन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेवोन कोंवे, कोलिन 
डि ग्रॅन्डहोमे, मॅट हेन्री, काइल जेमीसन, टॉम लाथम, हेन्री निकोल्स, ऐजाज 
पटेल, टिम साऊदी, रॉस टेलर, नील वॅगनर,, बी जे वाॅटलिंग आणि 
विल यंग.

n साऊथम्पटन : डब्ल्यूटीसी फायनलदरम्यान चेंडू स्विंग करण्यासाठी लाळेची गरज भासणार नाही. सामन्यात अखेरपर्यंत आमच्यापैकी प्रत्येकाला हा प्रयोग कायम राखावा लागेल,असे भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याला वाटते.
n भारताकडून १०१ कसोटी सामने खेळलेला ईशांत न्यूझीलंडविरुद्ध वेगवान माऱ्याचे नेतृत्व करणार आहे. स्टार स्पोर्ट्‌सच्या ‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमात ईशांत म्हणाला,‘ माझ्या मते चेंडू स्विंग करण्यासाठी लाळेची गरज भासणार नाही. संपूर्ण सामन्यादरम्यान आमच्यापैकी प्रत्येकाला चेंडू स्विंग करीत रहावा लागणार आहे. चेंडूची अवस्था चांगली राहिल्यास वेगवान गोलंदाजांना बळी घेणे सोपे जाते.’
n कोरोनामुळे आयसीसीने चेंडूवर लाळेचा वापर करण्यास बंदी घातली.आतापर्यंत ३०३ बळी 
घेणारा ईशांत पुढे म्हणाला,‘विविध प्रकारे सराव 
करीत बदलानुरूप स्वत:ला सज्ज करावे लागते. भारतात स्विंग उशिरा मिळते मात्र इंग्लंडमध्ये स्विंगमुळेच पूर्ण टप्प्याचा चेंडू टाकला जातो. थंड हवामानात हे काम कठीण असले तरी त्रासदायक 
नाही.’
n दरम्यान, सलामीचा युवा फलंदाज शुभमान गिल याने धावा काढताना बाद होणार नाही याची काळजी घेण्यासाठी 
मंद गतीचे चेंडू सोडून देण्यावर भर दिला. इंग्लंडमध्ये १९ वर्षांखालील तसेच ‘अ’ संघाकडून खेळताना आपण हेच तंत्र अवलंबले होते, असे शुभमान 
म्हणाला.

इंग्लंडवरील विजयाचे भारताविरुद्ध महत्त्व नाही : बोल्ट
n भारताविरुद्ध डब्ल्यूटीसी अंतिम सामना खेळताना इंग्लंडवर मिळविलेल्या कसोटी विजयाचा लाभ होणार नसल्याचे न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याचे मत आहे.
n दुसऱ्या कसोटीत सहा गडी बाद करणारा बोल्ट म्हणाला,‘ माझ्या मते या विजयाला फारसे महत्त्व नाही.चांगली तयारी प्रत्येकाला उपयुक्त ठरते. विजयी लय कायम राखू असा मला विश्वास वाटतो’.७३ कसोटी सामन्यांचा अनुभव असलेला बोल्ट पुढे म्हणाला,‘आयपीएलमुळे सर्वच खेळाडू एकमेकांशी परिचित असल्याने थोडीफार शेरेबाजी पहायला मिळेल. 
n मुंबई इंडियन्सचे अनेक सहकारी भारतीय संघात आहेत. पण सामाजिक अंतर राखूनच सर्वांसोबत संपर्कात राहू.’ 
 

Web Title: India Wins WTC Final - Penn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.