T20 World Cup, 2023 : India Women Cricket Team: महिला प्रीमिअर लीग २०२३ ची जोरदार तयारी सुरू झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लिलावात स्मृती मानधनासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( RCB) सर्वाधिक ३.४० कोटींची बोली लावली. WPL Auction मध्ये स्मृती सर्वात महागडी खेळाडू ठरली. पण, सध्या दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिलांच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत स्मृती मानधनाच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात स्मृतीला दुखापतीमुळे खेळता आले नव्हते. आज भारतीय महिला संघ वेस्ट इंडिजविरुद्ध खेळणार आहे आणि आजच्या सामन्यात ती खेळणार की नाही, याबाबत मोठे अपडेट्स समोर आले आहेत.
सानिया मिर्झावर RCBने सोपवली मोठी जबाबदारी; स्मृती मानधना अँड टीमला मार्गदर्शन करणार
भारतीय महिला संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक ट्रॉय कुलेय यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात स्मृती खेळण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ''ती फिटनेससाठी प्रचंड मेहनत घेत आहे आणि तिच्या तंदुरुस्तीची आम्ही चाचणी करत आहोत. ती तिच्यापरीने सर्व प्रयत्न करतेय आणि वेस्ट इंडिजविरुद्ध ती मैदानावर उतरेल अशा विश्वास आहे,''असे ते म्हणाले. मानधनाच्या बोटात फ्रॅक्चर नाही, परंतु खबरदारीचा उपाय म्हणून तिला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विश्रांती दिली गेली आहे.
महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना रविवारी पार पडला. या सामन्यात भारतीय संघानं तुफान फटकेबाजी करत पाकिस्तानच्या संघ पराभव केला. भारतानं १५० धावांचा पाठलाग करून विजय मिळवत इतिहास रचला. पाकिस्तानच्या संघानं भारतीय संघाला १५० धावांचं लक्ष्य दिलं होतं. राधा यादवनं ४ षटकांमध्ये २१ धावा देत सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. जमिमा रॉड्रीक्स आणि रिचा घोष यांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना लोळवत ७ विकेट्सनं विजय मिळवून दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"