Indias Gongadi Trisha Hits Historic First Ever Century In U19 Womens T20 World Cup : मलेशियातील क्वालालंपूर येथे सुरु असलेल्या १९ वर्षांखालील महिला वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या लेकीनं इतिहास रचला आहे. भारतीय महिला संघाच्या डावाची सुरुवात करणाऱ्या त्रिशा गोंगडी हिने मंगळवारी सुपर सिक्समधील पहिल्या लढतीत धमाकेदार शतक झळकावले. या खेळीसह १९ वर्षाखालील महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पहिले शतक झळकवण्याचा पराक्रम तिने करून दाखवला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
१८६.४४ च्या स्ट्राइक रेटनं ५९ चेंडूत नाबाद ११० धावांची खेळी
भारताची उजव्या हाताची बॅटर त्रिशानं स्कॉटलंड महिला संघा विरुद्धच्या लढतीत धमाकेदार खेळी केली. ५३ चेंडूत तिने शतकाला गवसणी घातली. त्रिशानं या सामन्यात १८६.४४ च्या स्ट्राइक रेटनं ५९ चेंडूत १३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ११० धावांची खेळी केली.
पहिल्या विकेटसाठी जी कमलिनीसोबत तगडी भागीदारी
१९ वर्षीय त्रिशानं पहिल्या विकेटसाठी जी कमलिनीच्या साथीनं १४७ धावांची भागादारी रचली. कमिलीनी हिने ४२ चेंडूत ५१ धावांचे योगदान दिले. त्यानंतर त्रिशानं सानिका चाल्काला सोबत घेऊन भारताचा डाव पुढे नेला. सानिकानं नाबाद २९ धावांची खेळी केली. सलामी जोडीच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतीय संघानं निर्धारित २० षटकात एका विकेटच्या मोबदल्यात २०८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा संघ १४ षटकात ५८ धावांत ऑलआउट झाला.
स्पर्धेतील टॉपर
सुपर सिक्समधील विक्रमी शतकी खेळीसह त्रिशानं यंदाची स्पर्धा एकदम खास केली आहे. या स्पर्धेत तिचाच बोलबाला असल्याचे दिसून येते. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटरच्या यादीत ती टॉपला आहे. पाच सामन्यात तिने २३० धावा केल्या आहेत. त्रिशा ही महिला अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धच्या पहिल्या हंगामातही भारतीय संघाचा भाग होती. त्यावेळी तिने ७ सामन्यात ११६ धावा केल्या होत्या.
Web Title: India Women U19 vs Scotland Women U19 Indias Gongadi Trisha Hits Historic First Ever Century In U19 Womens T20 World Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.