INDW vs AUSW Live | मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यातील वन डे मालिकेतील दुसरा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यातून श्रेयांका पाटीलने टीम इंडियासाठी वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आज श्रेयांका पाटील टीम इंडियासाठी पहिला आंतरराष्ट्रीय वन डे सामना खेळत आहे. या आधी श्रेयांकाने ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये पदार्पण केले आहे. महिला प्रीमिअर लीगच्या पदार्पणाच्या हंगामात चमकदार कामगिरी केल्यानंतर श्रेयांका प्रसिद्धीच्या झोतात आली. एक प्रभावी अष्टपैलू म्हणून श्रेयांकाने आपली छाप सोडली.
श्रेयांका पाटील महिला प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळते. महिला प्रीमिअर लीगच्या पहिल्याच सत्रात श्रेयांकाने चमकदार कामगिरी केली होती. श्रेयांकाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. यादरम्यान तिला ४९ धावा करता आल्या तसेच तीन बळी घेण्यात यश मिळाले.
कोण आहे श्रेयांका पाटील?
आजच्या सामन्यातून श्रेयांका पाटीलने भारतीय संघात पदार्पण केले आहे. श्रेयांका पाटील ही बंगळुरूची रहिवासी असून वयाच्या ८ व्या वर्षापासून तिने क्रिकेट खेळायला सुरूवात केली. श्रेयांका टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला क्रिकेटमधला तिचा आदर्श मानते. याशिवाय श्रेयांका आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला चीअर करत आली आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, यास्तिका भाटिया, रिचा घोष, स्नेह राणा, अमनजोत कौर, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, श्रेयांका पाटील, रेणुका सिंग.
Web Title: india Women vs Australia Women 2nd ODI Shreyanka Patil is all set to make her ODI Debut in Mumbai, read here details
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.