INDW vs AUSW: 'कसोटी' संपली! मिशन वन डे अन् ट्वेंटी-२०; बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताचा तगडा संघ

भारतीय महिला क्रिकेट संघ मायदेशात बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी वन डे आणि ट्वेंटी-२० मालिकेत भिडणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 01:27 PM2023-12-25T13:27:47+5:302023-12-25T13:28:21+5:30

whatsapp join usJoin us
India women vs Australia women Team India’s ODI and T20I squad against Australia announced  | INDW vs AUSW: 'कसोटी' संपली! मिशन वन डे अन् ट्वेंटी-२०; बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताचा तगडा संघ

INDW vs AUSW: 'कसोटी' संपली! मिशन वन डे अन् ट्वेंटी-२०; बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताचा तगडा संघ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India women vs Australia women | मुंबई: कसोटी सामन्यातील विजयानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ मायदेशात बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी वन डे आणि ट्वेंटी-२० मालिकेत भिडणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३-३ सामन्यांच्या मालिका होणार आहेत. २८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या वन डे मालिकेतील तिन्ही सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवले जातील. तर, ५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० मालिकेतील सामने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहेत. यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाशी दोन हात करेल. दरम्यान, अनेकदा मोठ्या व्यासपीठावर ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केले आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर मोठे आव्हान असेल. पण, कसोटी सामना जिंकल्यामुळे यजमान संघाचा नक्कीच आत्मविश्वास वाढला आहे. 

भारताचा वन डे संघ - 
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), रिचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, श्रेयांका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंग ठाकूर, तीतस साधू, पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, हरलीन देओल. 

भारताचा ट्वेंटी-२० संघ -
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), रिचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, श्रेयांका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंग ठाकूर, तीतस साधू, पूजा वस्त्राकार, कनिका आहुजा, मिन्नू मणी.

वन डे मालिका (सर्व सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर)

  1. २८ डिसेंबर - दुपारी दीड वाजल्यापासून
  2. ३० डिसेंबर - दुपारी दीड वाजल्यापासून
  3. २ जानेवारी - दुपारी दीड वाजल्यापासून

ट्वेंटी-२० मालिका (सर्व सामने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर)

  1. ५ जानेवारी - सायंकाळी ७ वाजल्यापासून 
  2. ७ जानेवारी - दुपारी दीड वाजल्यापासून
  3. ९ जानेवारी - दुपारी दीड वाजल्यापासून

Web Title: India women vs Australia women Team India’s ODI and T20I squad against Australia announced 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.