INDWvsMALW Live : आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मोहिमेला आजपासून सुरूवात झाली. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मलेशियाने नाणेफेक जिंकून भारतीय महिला क्रिकेट संघाविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार हरमनप्रीत कौर कॅप्टन असूनही आज ती खेळत नाहीए आणि स्मृती मानधाना संघाचे नेतृत्व सांभाळतेय. मानधना आणि शफाली वर्मा या दोघींनी भारताला आक्रमक सुरूवात करून दिली. ५.२ षटकांत फलकावर ५७ धावा चढवल्यानंतर मानधना २७ धावांवर ( १६ चेंडू व ५ चौकार) झेलबाद झाली. ५.४ षटकांचा खेळ झालेला असताना पावसामुळे मॅच थांबवावी लागली.
९ वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे . भारतीय महिला क्रिकेट संघ मलेशियाविरुद्ध पहिला सामना खेळत आहे. आयसीसी क्रमवारीमुळे संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. २४ जुलै रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर हरनप्रीत कौरवर ICCने दोन सामन्यांची बंदी घातली आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारतीय कर्णधाराला LBW देताच तिने रागाच्या भरात बॅट स्टंपवर आपटली. सामन्यानंतरही कौर गप्प बसली नाही आणि तिने बांगलादेश संघाचा अप्रत्यक्ष अपमान केला आणि अम्पायर्सना खडेबोल सुनावले. संयुक्त जेतेपदाची ट्रॉफी उचलताना तिने अम्पायर्सनाही बोलवा असे सांगितले. त्यांच्यामुळे हे शक्य झाल्याचे ती म्हणाली.
हरमनप्रीत इतकं बोलल्यानंतर आणि तिचं वागणं पाहून आयसीसीनं तिच्यावर दोन सामन्यांची बंदी घातली. अशा स्थितीत मलेशियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याला आणि उपांत्य फेरीतही ती टीम इंडियाचा भाग होऊ शकणार नाही.
भारताचा संघ - स्मृती मानधना ( कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉ़ड्रीग्ज, कनिका अहुजा, रिचा घोष ( यष्टिरक्षक), दीप्ती शर्मा, देविका वैद्य, अमनजोत कौर, पूजा पस्त्राकर, मिनू मणी, राजेश्वरी गायकवाड