INDW vs WIW : अर्धशतकी खेळीसह Smriti Mandhana नं मारला 'फिफ्टी प्लस'चा 'सिक्सर'

वनडे कारकिर्दीतील तिचे २९ वे शतक खूपच खास ठरले. कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 15:06 IST2024-12-24T14:56:41+5:302024-12-24T15:06:10+5:30

whatsapp join usJoin us
India Women vs West Indies Women 2nd ODI Smriti Mandhana Smash 29th ODI half century And Set Record 6 th successive fifty plus score in international cricket | INDW vs WIW : अर्धशतकी खेळीसह Smriti Mandhana नं मारला 'फिफ्टी प्लस'चा 'सिक्सर'

INDW vs WIW : अर्धशतकी खेळीसह Smriti Mandhana नं मारला 'फिफ्टी प्लस'चा 'सिक्सर'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Smriti Mandhana Smash 29th ODI half Century  And Set Record 6 th Successive Fifty Plus Score : भारतीय महिला संघाची स्फोटक बॅटर स्मृती मानधना हिने वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या वनडेतही दमदार अर्धशतक झळकावले आहे. भारत आणि वेस्ट इंडिज महिला संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना हा बडोदा क्रिकेट असोसिएशनच्या कोटंबी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे.

वनडे कारकिर्दीतील अर्धशतक ठरलं एकदम खास, कारण...

या सामन्यातही कामगिरीतील सातत्य कायम राखत स्मृती मानधनानं कडक खेळी साकारली. अर्धशतकासह तिने संघाला चांगली सुरुवात करून दिली. वनडे कारकिर्दीतील २९ वे शतक खूपच खास ठरले. कारण या अर्धशतकासह स्मृती मानधनानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग सहाव्यांदा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा खास विक्रम आपल्या नावे नोंदवला.

पहिल्या वनडेत शतक हुकलं, यावेळी ताळमेळाच्या अभावामुळे फसला मोठ्या खेळीचा डाव 

वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात स्मृती मानधनाचे शतक अवघ्या ९ धावांनी हुकले होते. या सामन्यात तिने १०२ चेंडूत १३ चौकाराच्या मदतीने ९१ धावांची खेळी केली होती. दुसऱ्या वनडेत पुन्हा ती मोठी खेळी करण्याच्या मूडमध्ये असल्याचे दिसत होते. पण युवा सलामीवीर प्रतिका रावळ आणि स्मृती मानधना यांच्यातील ताळमेळाची कमतरता दिसली. यातच स्मृती मानधनाने रन आउटच्या रुपात आपली विकेट गमावली. स्मृतीनं दुसऱ्या सामन्यात ४७ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५३ धावांची खेळी केली. पहिल्या विकेटसाठी या दोघींनी ९९ चेंडूत ११० धावांची दमदार भागीदारी केली.

Web Title: India Women vs West Indies Women 2nd ODI Smriti Mandhana Smash 29th ODI half century And Set Record 6 th successive fifty plus score in international cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.