फिल्ड सेट करत प्रियानं विणलं विकेटसाठी जाळं; अप्रतिम कॅचसह दीप्तीनं दिली साथ (VIDEO)

दीप्तीनं अगदी अप्रतिम झेल पकडत प्लिमरचा खेळ खल्लास केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 04:02 PM2024-10-29T16:02:24+5:302024-10-29T16:05:29+5:30

whatsapp join usJoin us
India Women Young Leg Spinner Priya Mishra Take Wicket Sophie Devine And Georgia Plimmer Deepti Sharma Sharp Catch At First Slip Watch Video | फिल्ड सेट करत प्रियानं विणलं विकेटसाठी जाळं; अप्रतिम कॅचसह दीप्तीनं दिली साथ (VIDEO)

फिल्ड सेट करत प्रियानं विणलं विकेटसाठी जाळं; अप्रतिम कॅचसह दीप्तीनं दिली साथ (VIDEO)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Deepti Sharma Sharp Catch At First Slip On Priya Mishra Bowling Watch Video : भारतीय महिला संघातील युवा लेग स्पिनर प्रिया मिश्रा (Priya Mishra ) हिने दुसऱ्या सामन्यातही आपल्या फिरकीतील जादू दाखवून दिली. न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यातून टीम इंडियात पदार्पण करणाऱ्या २० वर्षीय छोरीनं निर्णायक आणि तिसऱ्या सामन्यातील लढतीत न्यूझीलंडची स्टार बॅटर आणि कॅप्टन सोफी डिव्हाइन हिला बोल्ड केले. याशिवाय तिने सेट झालेल्या जॉर्जिया प्लिमर (Georgia Plimmer) हिला देखील तंबूचा रस्ता दाखवला. प्रिया मिश्राच्या दुसऱ्या विकेट्समध्ये स्लिपमध्ये फिल्डिंगला उभी असलेल्या दीप्ती शर्मानं सर्वोत्तम कॅच पकडत मोलाचा वाटा उचलला. 

संघ अडचणीत असताना ती एकटी उभी होती, प्रियानं हाणून पाडला  तिचा डाव 

प्रिया मिश्रानं न्यूझीलंडच्या डावातील ११ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर न्यूझीलंडची कॅप्टन सोफी डिव्हाइन हिला ९ धावांवर माघारी धाडले.  ११ चेंडूचा सामना करताना सोफीनं २ चौकाराच्या मदतीने ९ धावा केल्या. प्रियाच्या खात्यात जमा झालेली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही तिसरी विकेट ठरली. याआधीच्या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात तिने एक विकेट घेतली होती.  तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात आघाडीच्या विकेट्स पडल्यामुळे न्यूझीलंडचा संघ अडचणीत सापडला होता. एका बाजूनं विकेट पडत असताना जॉर्जिया संयमी खेळ करत संघाचा डाव  सावरण्याचा प्रयत्न करत होती. पण तिचा हा प्रयत्न युवा लेग स्पिन प्रिया मिश्रानं हाणून पाडला. न्यूझीलंडच्या डावातील १९ व्या षटकात प्रियानं तिला दीप्ती करवी झेलबाद केले.

फिल्डसेटअपमध्ये बदल अन्य न्यूझीलंडची बॅटर जाळ्यात फसली, दीप्तीनं घेतला अप्रतिम कॅच

परफेक्ट सेटअपनंतर जॉर्जियाची विकेट प्रिया मिश्राच्या खात्यात जमा झाली. १९ व्या षटकातील चौथा चेंडू निर्धाव टाकल्यावर भारतीय कॅप्टन हरमनप्रीत कौरनं फिल्डिंगमध्ये बदल केला. शॉर्ट थर्ड फिल्ड प्लेसमेंटवर असणारी दीप्ती पहिल्या स्लिपमध्ये फिल्डिंगसाठी आली. प्रियानं ऑफ स्टंप बाहेर आखूड टप्प्याचा चेंडू टाकून विकेटसाठी जाळ टाकलं. जॉर्जिया प्लिमर बॅकफूटवर जाऊन चेंडू कट करण्याचा प्रयत्न करायला गेली आणि ती फसली. चेंडू बॅटची कड घेऊन दीप्तीच्या दिशेनं गेला. दीप्तीनं अगदी अप्रतिम झेल पकडत प्लिमरचा खेळ खल्लास केला. न्यूझीलंडच्या या बॅटरनं ६७ चेंडूचा सामना करताना ६ चौकाराच्या मदतीने ३९ धावा केल्या. 

Web Title: India Women Young Leg Spinner Priya Mishra Take Wicket Sophie Devine And Georgia Plimmer Deepti Sharma Sharp Catch At First Slip Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.