Join us  

बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, ४ स्टार खेळाडू बाहेर, जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा पुरुष संघ १२ जुलैपासून वेस्ट इंडिज दौरा सुरू करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2023 4:35 PM

Open in App

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा पुरुष संघ १२ जुलैपासून वेस्ट इंडिज दौरा सुरू करणार आहे. त्याचवेळी भारताचा महिला संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे आणि या दौऱ्यासाठी बीसीसीआयने संघ जाहीर केला. या संघातून रेणुका सिंग, शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड आणि ऋचा घोष या स्टार खेळाडूंना बाहेर बसवण्यात आले आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये ICC ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आता भारतीय महिला संघ जुलै महिन्यात ट्वेंटी-२० व वन डे मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर लवकरच रवाना होणार आहे.

बीसीसीआयने रेणुका सिंग, शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड आणि ऋचा घोष यांना वगळण्याचे कारण दिले नाही. त्यांच्या जागी आसामची यष्टिरक्षक फलंदाज उमा छेत्री, अष्टपैलू मिन्नू मणी (केवळ टी-२० संघ), डावखुरी वेगवान गोलंदाज अनुषा बरेड्डी (आंध्र प्रदेश) आणि राशी कनोजिया (उत्तर प्रदेश) यांचा समावेश करण्यात आला आहे. हरमनप्रीत कौर बांगलादेश दौऱ्यावर भारतीय महिला संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. स्मृती मानधना उप कर्णधार आहे. 

मे महिन्यात बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत झालेल्या शिबिरातून महिला खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षकपद रिक्त असले तरी हृषिकेश कानिटकर हे अंतरिम प्रशिक्षकाची भूमिका निभावत आहेत. भारतीय महिला संघ बांगलादेश दौऱ्यावर पहिल्या ३ ट्वेंटी-२० आणि ३ वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. ९  जुलैपासून ट्वेंटी-२० सामन्याने या दौऱ्याची सुरूवात होईल.

ट्वेंटी-२० संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हर्लीन देओल, देविका वैद्य, उमा छेत्री (विकेटकीपर), अमनज्योत कौर, एस मेघना , पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, अंजली सरवानी, मोनिका पटेल, राशी कनोजिया, अनुषा बरेड्डी, मिन्नू मणी.

वन डे संघ : हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हरलीन देओल, देविका वैद्य, उमा छेत्री (विकेटकीपर), अमनजोत कौर, प्रिया पुनिया , पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, अंजली सरवानी, मोनिका पटेल, राशी कनोजिया, अनुषा बरेड्डी, स्नेह राणा.

वेळापत्रक :- 09-जुलै, पहिली T20I, दुपारी 1:3011-जुलै, दुसरी T20I, दुपारी 1:30 13-जुलै, तिसरी T20I, दुपारी 1:30 16-जुलै, पहिली ODI, सकाळी 9 19-July, दुसरी ODI, सकाळी 922 जुलै, तिसरी ODI, सकाळी 9 

 

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघटी-20 क्रिकेटभारत विरुद्ध बांगलादेश
Open in App