India Women’s squad for ICC Women’s World Cup 2022 : ४ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत न्यूझीलंड येथे होणाऱ्या आयससी महिला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची गुरुवारी घोषणा करण्यात आली. मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळणारा १५ सदस्यीय संघ जाहीर केला गेला. या संघातून जेमिमा रॉड्रीग्ज व शिखा पांडे या चांगल्या खेळाडूंची नाव नसल्यानं सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. भारताला पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना करावा लागणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय महिला यजमान न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची वन डे व एक ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्याचाही संघ आज जाहीर केला गेला.
वर्ल्ड कप व न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठीचा संघ - मिताली राज ( कर्णधार), हरमनप्रीत कौर ( उप कर्णधार) , स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटीया, दीप्ती शर्मा, रिचा घोष ( यष्टिरक्षक), स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकूर, तानिया भाटीया ( यष्टिरक्षक), राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव ( Team India for 5 ODIs against NZ & ICC Women’s World Cup, 2022: Mithali Raj (Captain), Harmanpreet Kaur (vice-captain), Smriti Mandhana, Shafali Verma, Yastika Bhatia, Deepti Sharma, Richa Ghosh (wicket-keeper), Sneh Rana, Jhulan Goswami, Pooja Vastrakar, Meghna Singh, Renuka Singh Thakur, Taniya Bhatia (wicket-keeper), Rajeshwari Gayakwad, Poonam Yadav) राखीव खेळाडू - सभ्भीनेनी मेघना, एकता बिस्त, सिमरन दील बहादूर ( Standby Players: Sabbhineni Meghana, Ekta Bisht, Simran Dil Bahadur)
वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक ६ मार्च - वि. पाकिस्तान१० मार्च - वि. न्यूझीलंड१२ मार्च - वि. वेस्ट इंडिज१६ मार्च - वि. इंग्लंड१९ मार्च - वि. ऑस्ट्रेलिया२२ मार्च - वि. बांगलादेश २७ मार्च - वि. दक्षिण आफ्रिका
एकमेव ट्वेंटी-२० सामन्यासाठी संघ - हरमनप्रीत कौर ( कर्णधार), स्मृती मानधना ( उप कर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटीया, दीप्ती शर्मा, रिचा घोष, स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकूर, तानिया भाटिया, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, एकता बिस्त, एस मेघना, सिमरन दील बहादूर ( India Women’s squad for one-off T20I: Harmanpreet Kaur (Captain), Smriti Mandhana (vice-captain), Shafali Verma, Yastika Bhatia, Deepti Sharma, Richa Ghosh (wicket-keeper), Sneh Rana, Pooja Vastrakar, Meghna Singh, Renuka Singh Thakur, Taniya Bhatia (wicket-keeper), Rajeshwari Gayakwad, Poonam Yadav, Ekta Bisht, S. Meghna, Simran Dil Bahadur.)
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेचे वेळात्रक - ९ फेब्रुवारी - एकमेव ट्वेंटी-२०; ११, १४,१६,२२,२४ फेब्रुवारीला वन डे सामने