रोहित शर्माचा रेकॉर्ड ब्रेकींग विजय! श्रेयस, लोकेशचे शतक अन् विराट, सूर्या, गिलची गोलंदाजी

ICC ODI World Cup IND vs NED Live :  भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अपराजित मालिका कायम राखताना नववा विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 09:32 PM2023-11-12T21:32:50+5:302023-11-12T21:33:27+5:30

whatsapp join usJoin us
India won by 160 runs, Rohit Sharma's record breaking victory! Centuries by Shreyas, Lokesh and bowling by Virat, Surya, Gill, rohit | रोहित शर्माचा रेकॉर्ड ब्रेकींग विजय! श्रेयस, लोकेशचे शतक अन् विराट, सूर्या, गिलची गोलंदाजी

रोहित शर्माचा रेकॉर्ड ब्रेकींग विजय! श्रेयस, लोकेशचे शतक अन् विराट, सूर्या, गिलची गोलंदाजी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup IND vs NED Live :  भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अपराजित मालिका कायम राखताना नववा विजय मिळवला. वर्ल्ड कपमध्ये सलग ९ विजय मिळवणारा रोहित शर्मा हा पहिला भारतीय कर्णधार ठरला. सौरव गांगुलीने २००३ मध्ये सलग ८ मॅच जिंकल्या होत्या. लोकेश राहुल, श्रेयस अय्यर यांचे शतक व विराट कोहली, रोहित शर्मा अन् शुबमन गिल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने चारशेपार धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजांनी नेदरलँड्सचा डाव गुंडाळला आणि भारताला १६० धावांनी विजय मिळवून दिला. आता १५ नोव्हेंबरला भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीच्या लढतीसाठी मैदानावर उतरेल. या सामन्यात विराट, शुबमन आणि सूर्यकुमार यादव यांनीही गोलंदाजी केली. विराटने ९ वर्षानंतर विकेट मिळवली. 

९ वर्षानंतर विराट कोहलीने विकेट घेतली, पाहा अनुष्का किती आनंदी झाली, Video 

मोहम्मद सिराजने दुसऱ्याच षटकात सलामीवीर वेस्ली बार्रेसीला ( ४) बाद केले. मॅक्स ओ'डोड ( ३०) आणि कॉलिन एकरमन ( ३५) यांनी संघर्षमय ६१ धावांची भागीदारी केली. कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी या सेट फलंदाजांना माघारी पाठवले. विराट कोहलीला गोलंदाजी द्या... ही चाहत्यांची दीर्घकालीन मागणी रोहितने आज मान्य केली आणि विराटने त्याच्या दुसऱ्या षटकात विकेट मिळवून दिली. नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड ( १७) वाईड जाणारा चेंडू छेडायला गेला अन् लोकेशने सुरेख झेल घेतला. २०१४ मध्ये विराटने शेवटची विकेट घेतली होती आणि ९ वर्षानंतर त्याने विकेट घेतली. विराटने विकेट घेताच स्टेडियम दणाणून गेलेच, परंतु त्याची पत्नी अनुष्कानेही जोरदार सेलिब्रेशन केले.

रोहितने आता चेंडू शुबमनच्या हाती दिला अन् त्याच्याकडूनही षटक फेकून घेतले. दुसऱ्याबाजूने जसप्रीत बुमराहचा मारा सुरू केला आणि त्याने बॅस डे लीडचा ( १२) त्रिफळा उडवला.  सूर्यकुमार यादवही गोलंदाजीला आला अन् आता रोहितने स्वतः गोलंदाजी करावी अशी मागणी होताना दिसली. सिराज पुन्हा मैदानावर आल्याने टीम इंडियाला दिलासा मिळाला. त्याने नेदरलँड्सचा सेट पलंदाज सायब्रँडला ( ४५) बाद केले. नेदरलँड्सला ६० चेंडूंत २२१ धावा विजयासाठी हव्या होत्या आणि ४ विकेट्स हाताशी होत्या. कुलदीपने आणखी एक धक्का देताना लॉगन व्हॅन बीकचा ( १६) त्रिफळा उडवला. ८ चेंडूंत १६ धावा करणाऱ्या रोएलॉफ व्हॅन डेर मर्वला जडेजाने झेलबाद केला. बुमराहने मॅच संपवली आणि नेदरलँड्सची संपूर्ण टीम ४७.५ षटकांत २५० धावांवर गुंडाळला. रोहितने शेवटची विकेट घेतली. तेजा निदामनुरुने ३९ चेंडूंत ५४ धावा केल्या.  

तत्पूर्वी, रोहित शर्मा ( ६१) व शुबमन गिल ( ५१) यांनी शतकी भागीदारी करून टीम इंडियासाठी मजबूत पाया रचला. विराट कोहली ( ५१) व श्रेयस अय्यर यांच्या ७१ धावांच्या खेळीने डावाला आकार दिला. लोकेशने ६४ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह १०२ धावा केल्या आणि श्रेयससह १२८ चेंडूंत २०८  धावांची भागीदारी केली. श्रेयस ९४ चेंडूंत १० चौकार व ५ षटकारांसह १२८ धावांवर नाबाद राहिला. भारताने ४ बाद ४१० धावा केल्या. 

Web Title: India won by 160 runs, Rohit Sharma's record breaking victory! Centuries by Shreyas, Lokesh and bowling by Virat, Surya, Gill, rohit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.