भारताने श्रीलंकेचा पराभव करून एकदिवसीय क्रिकेट मालिका जिंकली

भारतीय संघाने कर्णधार अजय रेड्डी आणि अनिल घरिया यांनी केलेल्या शतकांच्या मदतीने ४० षटकांमध्ये ६ गडी गमावून ४६४ धावांचा डोंगर रचला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 10:11 PM2018-10-25T22:11:10+5:302018-10-25T22:11:37+5:30

whatsapp join usJoin us
India won the one-day series by defeating Sri Lanka | भारताने श्रीलंकेचा पराभव करून एकदिवसीय क्रिकेट मालिका जिंकली

भारताने श्रीलंकेचा पराभव करून एकदिवसीय क्रिकेट मालिका जिंकली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कटक : भारताने आज कटक येथे झालेल्या दृष्टिहीन क्रिकेटपटूंच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमधील दुसऱ्या सामन्यामध्ये पराभव करून हि मालिका २ - ० ने जिंकली. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने कर्णधार अजय रेड्डी आणि अनिल घरिया यांनी केलेल्या शतकांच्या मदतीने ४० षटकांमध्ये ६ गडी गमावून ४६४ धावांचा डोंगर रचला. भारतीय फलंदाजांनी चांगली सुरुवात केली मात्र खेळाच्या मध्यावर भारताने काही फलंदाज गमावले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या अजय आणि अनिल या जोडीने नाबाद राहून अनुक्रमे १५५ आणि ११२ धावा करून भारतीय संघाचा धावफलक ४६४ धावांपर्यंत पोहोचविला.

श्रीलंकेला चांगली फलंदाजी करता आली नाही. श्रीलंकेच्या फलंदाजांनी चांगली खेळी करून संघाला ३५१ धावा करून दिल्या. या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ११३ धावांनी पराभव झाला. या मालिकेतील शेवटचा सामना २७ ऑक्टोबर २०१८ रोजी कोलकाता येथे खेळाला जाणार आहे.

Web Title: India won the one-day series by defeating Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.