रोहित शर्मा रडला, विराट अन् हार्दिकही रडला; बघा सूर्याच्या अफलातून कॅचने सामना फिरवला 

भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील १७ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 11:45 PM2024-06-29T23:45:36+5:302024-06-29T23:45:58+5:30

whatsapp join usJoin us
INDIA WON THE T20I WORLD CUP 2024, CAPTAIN ROHIT SHARMA, Virat Kohli & Hardik Pandya IS CRYING, SURYAKUMAR YADAV take GREATEST CATCH IN INDIAN CRICKET HISTORY, Video | रोहित शर्मा रडला, विराट अन् हार्दिकही रडला; बघा सूर्याच्या अफलातून कॅचने सामना फिरवला 

रोहित शर्मा रडला, विराट अन् हार्दिकही रडला; बघा सूर्याच्या अफलातून कॅचने सामना फिरवला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs SA Live Scorecard : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील १७ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ३० चेंडूंत ३० धावा हव्या असताना हार्दिक पांड्याने आफ्रिकेचा सेट फलंदाज हेनरिच क्लासेनची विकेट घेतली. त्यानंतर जसप्रीत बुमराहने मॅजिकल गोलंदाजी केली. तरीही २०व्या षटकात सामना आफ्रिका जिंकते की काय असे वाटत होते, परंतु सूर्यकुमार यादवने घेतलेल्या अविश्वसनीय झेलने सामन्याचा निकाल स्पष्ट केला. शेवटचा चेंडू पडताच रोहित शर्मा मैदानावर झोपला आणि जोरजोरात हात आपटून रडताना दिसला. विराट कोहली, हार्दिक, मोहम्मद सिराज, बुमराह, सुर्या सर्वांना आनंदाश्रू अनावर झाले. GREATEST CATCH IN INDIAN CRICKET HISTORY


२०१३ नंतर टीम इंडियाने पहिली आयसीसी ट्रॉफी उंचावताना दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत केले. संपूर्ण स्पर्धेत थंड पडलेली विराट कोहलीची बॅट फायनलमध्येच तळपली. अक्षर पटेलने मॅच विनिंग अष्टपैलू कामगिरी केली. २००७च्या वर्ल्ड कपमध्ये खेळाडू म्हणून वर्ल्ड कप उंचावणारा युवा रोहित, २०२४ मध्ये कर्णधार म्हणून जेतेपदाचा चषक उंचावताना भावनिक झालेला जगाने पाहिला. २०११ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत न मिळालेल्या संधीचं दुःख अखेर त्याच्या मनातून दूर झाले असावे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला संघाने जेतेपदाच्या ट्रॉफीसह निरोप दिला. हार्दिक पांड्या व जसप्रीत बुमराह यांनी आफ्रिकेच्या हातातून सामना खेचून आणला. सूर्यकुमार यादने २०व्या षटकात घेतलेला कॅच आफ्रिकेच्या पराभवासाठी पुरेसा ठरला. 

भारताच्या ७ बाद १७६ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेला ८ बाद १६९ धावाच करता आल्या आणि भारताने ७ धावांनी सामना जिंकला. ६ चेंडूंत १६ धावा आफ्रिकेला करायच्या होत्या. हार्दिकने टाकलेला पहिलाच चेंडू डेव्हिड मिलरने सीमापार पाठवला होता, परंतु सूर्यकुमार यादवने अप्रतिम झेल घेतला. मिलर ( २१) रडत रडत मैदानाबाहेर गेला.  हार्दिकने २०व्या षटकात आणखी एक विकेट घेऊन भारताचा विजय पक्का केला.  

Web Title: INDIA WON THE T20I WORLD CUP 2024, CAPTAIN ROHIT SHARMA, Virat Kohli & Hardik Pandya IS CRYING, SURYAKUMAR YADAV take GREATEST CATCH IN INDIAN CRICKET HISTORY, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.