IND vs SA Live Scorecard : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील १७ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ३० चेंडूंत ३० धावा हव्या असताना हार्दिक पांड्याने आफ्रिकेचा सेट फलंदाज हेनरिच क्लासेनची विकेट घेतली. त्यानंतर जसप्रीत बुमराहने मॅजिकल गोलंदाजी केली. तरीही २०व्या षटकात सामना आफ्रिका जिंकते की काय असे वाटत होते, परंतु सूर्यकुमार यादवने घेतलेल्या अविश्वसनीय झेलने सामन्याचा निकाल स्पष्ट केला. शेवटचा चेंडू पडताच रोहित शर्मा मैदानावर झोपला आणि जोरजोरात हात आपटून रडताना दिसला. विराट कोहली, हार्दिक, मोहम्मद सिराज, बुमराह, सुर्या सर्वांना आनंदाश्रू अनावर झाले. GREATEST CATCH IN INDIAN CRICKET HISTORY
भारताच्या ७ बाद १७६ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेला ८ बाद १६९ धावाच करता आल्या आणि भारताने ७ धावांनी सामना जिंकला. ६ चेंडूंत १६ धावा आफ्रिकेला करायच्या होत्या. हार्दिकने टाकलेला पहिलाच चेंडू डेव्हिड मिलरने सीमापार पाठवला होता, परंतु सूर्यकुमार यादवने अप्रतिम झेल घेतला. मिलर ( २१) रडत रडत मैदानाबाहेर गेला. हार्दिकने २०व्या षटकात आणखी एक विकेट घेऊन भारताचा विजय पक्का केला.