मुंबई : भारत हा शांतप्रिय देश आहे. भारत नेहमीच सर्वांशी चांगुलपणाने वागतो. पण आमचा चांगुलपणा हा कच्चा दुवा नाही, असा स्ट्रेट ड्राइव्ह भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरनेएअर स्ट्राईकनंतर लगावला आहे. पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यानंतर भारताने युद्धसराव केला होता. या हवाई दलाच्या युद्धसरावाला सचिनही उपस्थित होता.
भारतीय हवाई दलानं आज मोठी कारवाई करत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. 14 फेब्रुवारीला पुलवामा हल्ल्यानंतर मोदींनी बदला घेणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. भारतीय हवाई दलाच्या मिराज 2000’ची 12 लढाऊ विमानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवादी तळांवर हल्ले करत होती.
हवाई दलाच्या हल्ल्यानंतर सचिनने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये सचिन म्हणाला की, " आमचा चांगुलपणा म्हणजे कच्चादुवा नाही. भारतीय हवाई दलाला सलाम, जयहिंद."
भारताच्या युद्धसरावाला सचिन तेंडुलकरची उपस्थिती
भारताच्या हवाई दलाने पोखरण येथे युद्धसराव करण्यात आला. या युद्धसरावाला भारताचा संसदपटू आणि माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर उपस्थित होता. याबाबतची माहिती दस्तुरखुद्द सचिनने आपल्या ट्विटरवरून दिली आहे.
सचिनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, " हवाई दलासह असणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. या वीरांबरोबर उपस्थित राहणे, हा माझा सन्मान आहे. कारण ते आपल्या देशाचे संरक्षक आहे. शत्रूंपासून ते आपले संरक्षण करतात आणि त्यांच्यामुळेच आपण सुरक्षित जगू शकत आहोत."
पुलवामा हल्ल्याच्या दोन दिवसानंतरच आज भारतीय हवाई दलानं भारत-पाक नियंत्रण रेषेजवळील जैसलमेरच्या पोखरणमध्ये युद्धसराव केला. पोखरण रेंजमध्ये करण्यात आलेल्या हा भारतीय हवाई दलाचा देशातील सर्वात मोठा युद्धाभ्यास आहे. या युद्धाभ्यासात 130 लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर, अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टरचा समावेश होता. वायुशक्ती 2019या कार्यक्रमांतर्गत हे शक्तिप्रदर्शन करण्यात आलं आहे. सरकारचे आदेशाचं पालन करत कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही सक्षम असल्याचं हवाई दलाचे प्रमुख बीएस धनोआ यांनी सांगितलं आहे.
भारताच्या खेळाडूंचा भारतीय हवाई दलाला कुर्निसात
भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने, " भारतीय हवाई दलाला सलाम, शानदार..." असे ट्विट केले आहे. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने ही याबाबत एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये चहल म्हणाला की, " Indian Air Force, Bohot Hard Bohot Hard. "
भारताची फुलराणी सायना नेहवालनेही ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये सायना म्हणाली की, "Big salute to our #IndianAirForce 🙏🇮🇳.... #IndiaStrikesBack .. Jai Hind. "
भारताचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतनेही ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये श्रीकांतने, " Hats off to the #IndianAirForce for their strike against terror. Every Indian is proud of you! Jai Hind!" असे म्हटले आहे.
Web Title: Indian Air Strike on Pakistan: Our niceness should never be comprehended as our weakness, telling Sachin Tendulkar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.