वर्ल्ड कप फायनलमधून पदार्पण, IPLमध्ये जलद शतक; दोन वर्ल्ड कप नावावर असलेल्या भारताच्या खेळाडूची निवृत्ती

Yusuf Pathan Retirement २००७मध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) युवा खेळाडूला पदार्पणाची संधी दिलेल्या खेळाडूनं आज निवृत्ती जाहीर केली.

By स्वदेश घाणेकर | Published: February 26, 2021 04:46 PM2021-02-26T16:46:30+5:302021-02-26T17:02:37+5:30

whatsapp join usJoin us
Indian all-rounder Yusuf Pathan announces retirement from all forms of the game | वर्ल्ड कप फायनलमधून पदार्पण, IPLमध्ये जलद शतक; दोन वर्ल्ड कप नावावर असलेल्या भारताच्या खेळाडूची निवृत्ती

वर्ल्ड कप फायनलमधून पदार्पण, IPLमध्ये जलद शतक; दोन वर्ल्ड कप नावावर असलेल्या भारताच्या खेळाडूची निवृत्ती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

२००७मध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) युवा खेळाडूला पदार्पणाची संधी दिली. टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न सत्यात उतरत होतं, पण थेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पदार्पणाची संधी मिळेल, याची कल्पनाही त्यानं केली नव्हती. त्या सामन्यात तो फार काही करू शकला नाही, परंतु त्यांनतर मर्यादित षटकांच्या सामन्यात त्यानं स्फोटक फलंदाज अशी स्वतःची ओळख निर्माण केली. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून ट्वेंटी-20 संघात पदार्पण करणाऱ्या युसूफ पठाणनं ( Yusuf Pathan) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानं भारताकडून ५७ वन डे व २२ ट्वेंटी-२० सामने खेळले. ( Yusuf Pathan Retirement )  मुंबई इंडियन्सच्या खेळाडूची तुफान फटकेबाजी, २३ चेंडूत चोपल्या ९८ धावा

इंडियन प्रीमिअर लीगमध्येही युसूफची बॅट चांगलीच तळपली. त्याच्या नावावर आयपीएलची तिन जेतेपदं आहेत. त्यापैकी एक जेतेपद हे त्यानं राजस्थान रॉयल्सकडून ( २००८), तर दोन कोलकाता नाइट रायडर्सकडून ( २०१२ व २०१४) पटकावलं. २००८च्या पहिल्याच आयपीएलमध्ये त्यानं RRकडून ४३५ धावा कुटल्या आणि जून २००८मध्ये त्याला भारताच्या वन डे सघात संधी मिळाली. आयपीएलमध्ये सर्वात जलद ( ३७ चेंडूंत) शतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजाचा विक्रम आजही युसूफच्या नावावर आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही सर्वात जलद शतकाचा विक्रम त्यानेच केला आहे. २००७चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि २०११चा वन डे वर्ल्ड कप विजेत्या संघांचा तो सदस्य होता. यंदाची Asia Cup टीम इंडियाशिवाय होणार?; इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या निकालानंतर सर्व ठरणार

युसूफनं पोस्ट लिहून निवृत्ती जाहीर केली. ''आजही मला पहिल्यांदा भारताची जर्सी परिधान केल्याचा दिवस आठवतोय... ती केवळ जर्सी नव्हती, तर माझे कुटुंब, मित्र, प्रशिक्षक आणि भारतातील प्रत्येक चाहत्यानं माझ्या खांद्यावर सोपवलेली जबाबदारी होती. भारतासाठी दोन वर्ल्ड कप जिंकणे आणि सचिन तेंडुलकरला खांद्यावर उचलून घेणे, हे कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण आहेत,''असे त्यानं लिहिले. त्यानं सर्वांचे आभार मानले. 

युसूफनं २००९-१०मध्ये पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करताना ५३६ धावांचा पाठलाग करताना दक्षिण विभागाविरुद्ध १९० धावा चोपल्या होत्या आणि ती प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चौथ्या डावातील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. 
 

युसूफ पठाणची कामगिरी  
१०० प्रथम श्रेणी सामने - ४८२५ धावा व २०१ विकेट्स
१९९ लिस्ट ए सामने - ४७९७ धावा व १२४ विकेट्स
२७४ ट्वेंटी-20 सामने - ४८५२ धावा व ९९ विकेट्स
५७ वन डे सामने - ८१० धावा व ३३ विकेट्स
२२ ट्वेंटी-20 सामने -  २३६ धावा व १३ विकेट्स  

वन डे क्रिकेटमधील टॉप कामगिरी
५०* ( २९) वि. इंग्लंड, इंदूर २००८
५९* ( ३८) वि. श्रीलंका, कोलंबो २००९
१२३* ( ९६) वि. न्यूझीलंड, बंगळुरू २०१०
१०५ ( ७०) वि. दक्षिण आफ्रिका, सेन्च्युरियन २०११ 

Web Title: Indian all-rounder Yusuf Pathan announces retirement from all forms of the game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.