Join us  

Rohit Sharma Indian Captain: मराठमोळ्या माजी क्रिकेटपटूचं सडेतोड मत; म्हणाला, "रोहित शर्माला कर्णधार करण्याचा निर्णय..."

भारतीय गोलंदाजांबद्दलही मांडली केली रोखठोक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 4:28 PM

Open in App

Rohit Sharma Indian Captain: भारतीय संघ सध्या बदलाच्या काळातून जात आहे. विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर आता रोहित शर्माकडे ती जबाबदारी असणार आहे. आफ्रिका दौऱ्यावर रोहित संघात नव्हता. पण आता तो पुन्हा संघात आला असून कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडणार आहे. अशा वेळी, वन डे आणि टी२० अशा दोन्ही संघांसाठी रोहित शर्माला कर्णधार करण्याचा बीसीसीआयचा निर्णय योग्यच असल्याचं मत मराठमोळा माजी क्रिकेटपटू अजित आगरकरने व्यक्त केलं. तसेच, रोहितला कर्णधार म्हणून यशस्वी कारकीर्द घडवायची असेल तर त्याला काय करावं लागेल याबद्दलही आगरकरने भावना व्यक्त केल्या.

"वन डे आणि टी20 साठी एकच कर्णधार असणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे रोहितला कर्णधार करणं हा बीसीसीआयचा निर्णय योग्यच आहे. पण आता रोहित कर्णधार झाल्यानंतर त्याच्यापुढे जे मुख्य आव्हान असेल ते म्हणजे फिट राहणं आणि सगळे सामने खेळणं. आतापासून ते वर्ल्ड कप सुरू होईपर्यंत त्याला सर्व सामने खेळावेच लागतील. विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांनी फिटनेस कडे चांगलं लक्ष दिलं. त्यामुळे त्यांना फार कमी सामन्यांना मुकावे लागले", असं सडेतोड मत आगरकरने व्यक्त केलं.

"सध्या भारतीय संघ गोलंदाजांमध्ये विविध पर्याय तपासून पाहत आहे. ते एक अर्थी योग्यच आहे. कारण सध्या भारताला विविध पर्यायांची गरज आहे. भारतीय गोलंदाजी ही सध्या थोडी कमकुवत झाल्यासारखी वाटत आहे. त्यामुळे आता गोलंदाज कशी कामगिरी करतात याकडे माझं लक्ष असणार आहे. शमी असो किंवा बुमराह असो... तुम्ही १-२ गोलंदाजांवर अवलंबून राहू शकत नाही. तुमच्याकडे कायम पर्याय उपलब्ध असायला हवेत. आता भारताकडे पर्याय आहेत फक्त त्यांना योग्य संधी मिळणं गरजेचं आहे. त्याच दृष्टीने सध्या प्रयत्न सुरू आहेत", असेही आगरकर म्हणाला.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्माविराट कोहली
Open in App