Captain Cheteshwar Pujara : भारताच्या कसोटी संघातील मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा याने कौंटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करताना पुनरागमन केले. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील कसोटी मालिकेनंतर पुजाराचे संघातील स्थान गमावले होते. रणजी करंडक स्पर्धेतही त्याला फार चांगली कामगिरी करता आली नव्हती आणि त्यामुळे त्यानै कौंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला अन् तिथे धावांचा सडाच पाडला. त्याने कौंटी चॅम्पियनशीपमध्ये ससेक्स ( Sussex) क्लबकडून यंदा ४ सामन्यांत दोन द्विशतकं व दोन शतकांसह १४३.४०च्या सरासरीने ७१७ धावा चोपल्या आणि आता याच कामगिरीमुळे त्याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
चेतेश्वर पुजारीची ससेक्सच्या प्रभारी कर्णधारपदी निवड झाली आहे. क्लबचा कर्णधार टॉम हैनेस याला दुखापतीमुले 5-6 आठवडे मैदानाबाहेर रहावे लागणार आहे. मागील आठवड्यात लिएसेस्टरशायर क्लबविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना त्याच्या हाताचे हात मोडले गेले होते. मुख्य प्रशिक्षक इयान सलिस्बरी यांनी सांगितले की,''टॉम याच्या अनुपस्थितीत पुजारा संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याच्यात नेतृत्वगुण आहेत.''
चेतेश्वर पुजाराची कामगिरी6(15)201*(387)109(206)12(22)203(334)16(10)170*(197)