मँचेस्टर: भारतापुढे विश्वचषकाच्या सहाव्या साखळी सामन्यात गुरुवारी वेस्ट इंडिजचे आव्हान असेल. या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे. दुसरीकडे वेस्ट इंडिजच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जवळपास मावळल्या असल्या तरीही ते इतरांसाठी अजूनही धोकादायक ठरू शकतात. अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात ५२ चेंडूत केलेल्या २८ धावांच्या खेळीनंतर भारतीय संघ व्यवस्थापन धोनीचे फलंदाजीतील स्थान बदलण्याच्या विचारात आहे.विंडीजकडे गमाविण्यासारखे काहीही नाही तर साखळी फेरीत भारताला अद्याप चार सामने खेळायचे आहेत. दुसºया पॉवर प्लेमधील महत्त्वाच्या खेळात धोनीचे अपयश कर्णधार कोहलीसाठी डोकेदुखी ठरले आहे. सचिन तेंडुलकर याने देखील धोनीच्या खेळावर भाष्य करताना माहीच्या खेळात सकारात्मकवृत्तीचा अभाव असल्याचे म्हटले होते. यावर एकमेव उपाय असा की केदार जाधव किंवा हार्दिक पांड्या यांच्यापैकी एका फलंदाजाला धोनीच्या जागेवर बढती देता येईल. हार्दिक पांड्याला दुसºया टोकाहून सहकार्य मिळण्याची गरज आहे. असे न झाल्यास त्याच्यावर दडपण येण्याची भीती आहे.कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री हे आतापर्यंत ऋषभ पंत याला संधी देण्याबाबत फार उत्सुक दिसले नाहीत. व्यवस्थापनाने विजय शंकरला बाहेर केल्यास पंतला संघात स्थान मिळू शकेल. विंडीज संघात अनेक वेगवान गोलंदाज असल्याने धोनी या सामन्यात धावा काढू शकतो, पण फिरकीपटूंचा मारा खेळताना तो चाचपडतो, असे पाहण्यात आले आहे. संघाला धोनीचे डावपेच आणि त्याचे वेगवान यष्टिरक्षण या दोन्ही गोष्टींची गरज असल्याने कर्णधार आणि कोच यांना निवडीसाठी बरेच डोके खाजवावे लागू शकते.वेस्ट इंडिज देखील अन्य संघांचे समीकरण बिघडवून विश्वचषकाचा यशस्वी निरोप घेण्याच्या बेतात आहे. फलंदाजीत ढेपाळलेल्या या संघाने गोलंदाजीत चांगली क्षमता देखील दाखविली आहे. कोहली आणि रोहित शर्मा यांच्या संयमापुढे विंडीजच्या वेगवान माºयाची खºयार्थाने परीक्षा राहणार आहे. सामना जिंकण्यासाठी भारतीय गोलंदाजांना ख्रिस गेल आणि कार्लोस ब्रेथवेट यांना लवकर बाद करावेच लागेल. एकूणच हा सामना भारतासाठी सोपा ठरणार नसला तरी अलिकडची कामगिरी पाहता भारताला संभाव्य विजेता मानले जात आहे. त्याचवेळी भारतीय संघासाठी जमेची बाब म्हणजे विंडीज खेळाडूंमध्ये असलेला संयमाचा अभाव. टी२० क्रिकेट अधिक खेळत असलेल्या विंडीज खेळाडूंवर सुरुवातीपासून दबाव राखल्यास भारताला बाजी मारणे सोपे होईल. (वृत्तसंस्था)कोहली मोडणार सचिन तेंडुलकरचा ‘विराट’ विश्वविक्रम1क्रिकेटविश्वात एके काळी सर्वाधिक विश्वविक्रम भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर होते, पण सचिन निवृत्त झाल्यावर त्याचे काही विश्वविक्रम भारताचा कर्णधार विराट कोहलीने मोडले. आता विंडीजविरुद्धच्या सामन्यातही कोहली सचिनचा एक विश्वविक्रम मोडण्यासाठी सज्ज झाला आहे. विंडीजविरुद्धच्या सामन्यातून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २० हजार धावांचा विश्वविक्रम नोंदविण्याची संधी आहे आणि त्यासाठी त्याला केवळ ३७ धावा कराव्या लागतील.2पाकिस्तानविरुद्ध कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ११ हजार धावा करण्याचा विश्वविक्रम केला होता. आता त्याला सर्वात जलद २० हजार आंतरराष्ट्रीय धावांचा विश्वविक्रम करून सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा या महान फलंदाजांना मागे टाकण्याची संधी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजार धावा करणारा कोहली जगातील बारावा, तर सचिन (३४,३५७) आणि राहुल द्रविड (२४,२०८) यांच्यानंतर तिसरा भारतीय फलंदाज ठरणार आहे. कोहलीच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ११,०२० धावा, कसोटीत ६,६१३ आणि टी२० मध्ये २,२६३ धावा आहेत.3सचिन आणि लारा यांनी सर्वात कमी म्हणजे ४५३ डावांत २० हजार आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४१५ डावांत ( १३१ कसोटी, २२२ एकदिवसीय आणि ६२ टी२०) फलंदाजी केली आहे. त्यात त्याने १९,८९६ धावा फटकावल्या आहेत. तेंडुलकर आणि लारा यांच्यानंतर या क्रमवारीत तिस-या क्रमांकावर रिकी पाँटिंगचा (४६८) क्रमांक येतो.हेड-टू-हेडदोन्ही संघातीलएकूण सामने 126भारत विजयी 59विंडीज विजयी 62टाय : २ अनिर्णित : ३दोन्ही संघातील अखेरचे पाच सामनेविंडीज विजयी : १, भारत विजयी : ३, टाय : १,विश्वचषकातील सामने : ८, विंडीज विजयी : ३भारत विजयी : ५विश्वचषकात दोन्ही संघांची एकमेकांविरुद्ध सर्वोच्च धावाविंडीज : २८२ धावा भारत : २६८ धावाविश्वचषकात दोन्ही संघांची एकमेकांविरुद्ध निचांकी धावसंख्याविंडीक : १४० धावा भारत : १७४ धावा
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ICC World Cup 2019 : विंडीजच्या वेगवान माऱ्यापुढे आज भारतीयांची परीक्षा
ICC World Cup 2019 : विंडीजच्या वेगवान माऱ्यापुढे आज भारतीयांची परीक्षा
भारतापुढे विश्वचषकाच्या सहाव्या साखळी सामन्यात गुरुवारी वेस्ट इंडिजचे आव्हान असेल. या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 4:18 AM