Virat Kohli: खराब फॉर्मचा सामना करत असलेल्या कोहलीसंदर्भात आली मोठी बातमी, आता घेतला असा निर्णय

पुढील महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेत होणाऱ्या आशिया चषक 2022 साठी तो पुन्हा संघात सहभागी होणे अपेक्षित आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 06:17 PM2022-07-17T18:17:10+5:302022-07-17T18:19:48+5:30

whatsapp join usJoin us
Indian Batsman Virat kohli to completely avoid cricket for a month before returning at asia cup report | Virat Kohli: खराब फॉर्मचा सामना करत असलेल्या कोहलीसंदर्भात आली मोठी बातमी, आता घेतला असा निर्णय

Virat Kohli: खराब फॉर्मचा सामना करत असलेल्या कोहलीसंदर्भात आली मोठी बातमी, आता घेतला असा निर्णय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली रविवारी ओल्ड ट्रॅफर्ड येथे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या वनडे सामन्यानंतर, क्रिकेटपासून ब्रेक घेईल आणि 27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कप-2022 च्या तयारीसाठी परतण्यापूर्वी आपल्या कुटुबासोबत वेळ घालवेल. माध्यमांतील वृत्तांनुसार, कोहली त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवणार आहे. यात त्याच्या आईचाही समावेश आहे. तसेच, क्रिकेटमधून ब्रेक घेण्याची त्याची इच्छा असेल, असेही बोलले जात आहे.

खराब फॉर्मचा सामना करतोय कोहली -
कोहलीची पत्नी बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि मुलगी आधीपासूनच लंडनमध्ये आहे. सर्व फॉरमॅटमधील मालिका संपल्यानंतर कोहलीच्या कुटुंबातील आणखी काही सदस्य त्यांच्यासोबत सामील होतील. कोहलीला 22 जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या आठ सामन्यांच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. तसेच, पुढील महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेत होणाऱ्या आशिया चषक 2022 साठी तो पुन्हा संघात सहभागी होणे अपेक्षित आहे.

विराट कोहली लंडनमध्ये अनुष्का शर्मासह कृष्णा दास यांच्या प्रवचन कार्यक्रमात सहभागी झाल्याचीही चर्चा आहे. ट्विटरवर फोटोंमध्ये विराट, अनुष्का आणि एका अनोळखी व्यक्तीला लंडनमध्ये एका प्रवचन कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दाखवण्यात आले आहे. "विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लंडनमध्ये कृष्णदास कीर्तन कार्यक्रमात सहभागी झाले," असे ट्विट एका चाहत्याने केले आहे.

Web Title: Indian Batsman Virat kohli to completely avoid cricket for a month before returning at asia cup report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.