Join us  

भारतीय फलंदाजांची मोठी ‘कसोटी’

दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस लॉडर््स मैदानावार पावसामुळे धुऊन निघाल्यानंतर दुस-या दिवसापासून भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्याला सुरुवात झाली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 3:00 AM

Open in App

- अयाझ मेमनदुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस लॉडर््स मैदानावार पावसामुळे धुऊन निघाल्यानंतर दुस-या दिवसापासून भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्याला सुरुवात झाली. त्यातही सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्याने खेळ उशिराने सुरू झाला, पण सुरुवातीला बसलेल्या धक्क्यांमुळे भारतीय डावाची निराशाजनक सुरुवात झाली. ८.३ षटकांमध्ये भारताची ३ बाद १५ धावा अशी केविलवाणी स्थिती झाली आणि यावरूनच भारताची वाटचाल अत्यंत खडतर असल्याचे स्पष्ट झाले. ज्या प्रकारे मुरली विजय आणि लोकेश राहुल हे सलामीवीर बाद झाले ते अत्यंत निराशाजनक ठरले. राहुलने शिखर धवनची जागा घेतल्याने त्याच्याकडून खूप आशा बाळगली जात होती. त्याचप्रमाणे संघात स्थान देण्यात आलेला आणि तिसºया क्रमांकावर खेळविण्यात आलेल्या चेतश्वर पुजारानेही निराशा केली. भारतासाठी ही अत्यंत खराब सुरुवात ठरली.आघाडीची फळी सपशेल अपयशी ठरल्याने पुन्हा एकदा भारताची मधली फळी अत्यंत दबावाखाली आली आहे. त्याचबरोबर चेंडू जेव्हा स्विंग होतो तेव्हा भारतीय फलंदाज अडचणीत येतात हे पुन्हा सिद्ध झाले आहे. नक्कीच जेम्स अँडरसन उच्च दर्जाचा गोलंदाज आहे त्यात वाद नाही. पण मुरली विजय, लोकेश राहुल आणि चेतेश्वर पुजारा हे तिन्ही फलंदाजदेखील त्याच तोडीचे फलंदाज आहेत हे विसरता कामा नये. शिवाय भारतीय संघाची आत्ताची फलंदाजी पाहिली, तर यामध्ये कोणी नवोदित फलंदाज नाही. प्रत्येकाकडे मोठा अनुभव आहे. तसेच इंग्लंडसारख्या कठीण दौºयासाठी मोठी तयारी करून गेल्यानंतरही फलंदाजीची अशी अवस्था झाली आहे.पुन्हा एकदा कर्णधार विराट कोहलीवर मोठी जबाबदारी आली होती. पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात त्याने शानदार शतक झळकावले, तर दुसºया डावात अर्धशतक झळकावले. त्याने पहिल्याच सामन्यात २०० धावा फटकावल्या. पण जेव्हा कधी भारतीय संघ विदेशात खेळतो, तेव्हा कोहलीचा अपवाद वगळता एकही फलंदाज चमकदार खेळी करू शकत नाही, याचे आश्चर्य मला वाटते. ही खूप चिंतेची बाब आहे.या सामन्यात पहिल्या डावामध्ये चांगली भागीदारीच भारताला वाचवू शकत होती. परंतु, सध्या एक परंपरा सुरू आहे की, जर कोहली खेळला नाही, तर भारताची धावसंख्या अडीचशेच्या पलीकडेही जाऊ शकत नाही. ही खूप गंभीर बाब आहे. यावरून विदेशामध्ये भारताची एकूण फलंदाजी किती कमजोर आहे हेच दिसते. हीच गोष्ट जर कायम राहिली, तर आगामी दौºयांवरही भारताला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल. कारण सर्वांच्याच नजरा भारताच्या फलंदाजांवर आहेत.भारतीय फलंदाजांना त्यांच्या अपयशाचे कारण चांगल्या प्रकारे माहीत असून याकडे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर आणि मुख्य प्रशिक्षकांनी बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे.दुसºया कसोटी सामन्याविषयी बोलायचे झाल्यास जवळजवळ दीड दिवस पावसामुळे वाया गेले आहेत. या सामन्यात कुलदीप यादवला खेळविण्यात आले आहे. पण माझ्या मते भारतीयांनी ३५० पर्यंतची मजल मारायला पाहिजे होती. पण आता फलंदाजी सपशेल अपयशी ठरल्याने सामना जिंकणे खूप अवघड जाईल. त्यामुळे आता सामना वाचवण्यासाठी भारतीयांना खूप घाम गाळावा लागेल. उर्वरीत सामन्यांत भारतीय संघाकडून कशाप्रकारे खेळ होतो, हेच आता पहावे लागेल.(संपादकीय सल्लागार)

टॅग्स :अयाझ मेमन