Ayushi Soni smashed double century - भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने जिला भविष्याचा स्टार म्हटले होते त्या आयुषी सोनीने २३ वर्षांखालील महिलांच्या वन डे क्रिकेट स्पर्धेत विक्रमी द्विशतक झळकावले. आयुषीने नाबाद २३४ धावांची खेळी खेळून विक्रमही मोडीत काढला. तिच्या या विक्रमी खेळीत २१ चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. तिने चौकार-षटकारांनी फक्त २५ चेंडूंत १०८ धावा जोडल्या. त्याच्या मदतीने दिल्ली संघाने ३४८ धावांनी विजय मिळवला. अरुणाचल प्रदेश विरुद्ध सामन्यात आयुषीने ही विक्रमी खेळी केली.
तिच्या या फटकेबाजीने अरुणाचल प्रदेशच्या गोलंदाजांमध्येच नव्हे तर रोहित शर्माच्या चाहत्यांमध्येही धाकधुक पसरली होती. लिस्ट ए क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध २६४ धावा केल्या होत्या आणि हा विक्रम आज मोडता मोडता राहिला. पण, आयुषीने या खेळीच्या जोरावर या स्पर्धेत सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम नावावर केला.
दिल्ली आणि अरुणाचल प्रदेश यांच्यात झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने ५० षटकांत ४१० धावांचा डोंगर उभा केला. आयुषीने १५४ चेंडूत नाबाद २३४ धावा केल्या, तर एकता भदानाने नाबाद ८८ धावा केल्या. दिल्लीने अरुणाचलला ४११ धावांचे लक्ष्य दिले, त्याला प्रत्युत्तरात अरुणाचलचा संघ ३९.३ षटकांत ६२ धावांवर सर्वबाद झाला. मधुने १० धावांत पाच बळी घेतले. अरुणाचलसाठी डी पॉपीने सर्वाधिक १६ धावा केल्या.
Web Title: Indian batter Ayushi Soni smashed double century in Womens Under 23 One Day Trophy, hit 25 boundaries in a historic knock
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.