भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) क्रिकेटमधून जरी निवृत्त झाला असला तरी आजही तो अनेकांची मनं जिंकतोय. सोशल मीडियावर सातत्याने सक्रीय असलेल्या सेलिब्रेटींपैकी तेंडुलकर हा एक आहे आणि त्यानं नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यानं जखमी झालेल्य पक्ष्याचे प्राण वाचवले आहे.
शुक्रवारी त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यात त्याच्या हातात जखमी पक्षी दिसत आहे. कोणत्यातरी समुद्रकिनाऱ्यावरील हा व्हिडीओ आहे आणि तो पक्षी तेंडुलकरला किनाऱ्यावर सापडला. त्याने त्याला अलगद उचलले आणि नजिकच्या रेस्ट्राँमध्ये घेऊन गेला. तेथे त्याने कर्मचाऱ्याला पक्ष्याला काहीतरी खायला आणण्यास सांगितले. त्याने लिहिले की, थोडीशी काळजी आणि आपुलकीने आपले जग आणखी सुंदर बनू शकते.
पाहा व्हिडीओ...
Web Title: Indian Batting Legend Sachin Tendulkar Saves Injured Bird at a Beach and Netizens Are Loving the Viral Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.