रोहित शर्माच्या टीम इंडियाला 'नकार'; पण भारताची 'ही' क्रिकेट टीम मात्र पाकिस्तानात जाणार!

Indian cricket team in Pakistan: Champions Trophy 2025 पाकिस्तानात असून भारताच्या संघाला या दौऱ्यावर न पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 01:34 PM2024-11-12T13:34:06+5:302024-11-12T13:36:41+5:30

whatsapp join usJoin us
Indian blind cricket team gets NOC for Pakistan tour from sports ministry clearance awaited from mea and mha blind t20 world cup | रोहित शर्माच्या टीम इंडियाला 'नकार'; पण भारताची 'ही' क्रिकेट टीम मात्र पाकिस्तानात जाणार!

रोहित शर्माच्या टीम इंडियाला 'नकार'; पण भारताची 'ही' क्रिकेट टीम मात्र पाकिस्तानात जाणार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup 2024 IND vs PAK: पुढील वर्षी होणाऱ्या Champions Trophy 2025 बाबत सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) आपला संघ पाकिस्तान दौऱ्यावर न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पण याचदरम्यान, आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय अंध क्रिकेट संघाला पाकिस्तानात जाण्यास मान्यता मिळाली आहे. अंध T20 क्रिकेट विश्वचषक 2024 चे आयोजन पाकिस्तानात आहे. ही स्पर्धा २३ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत खेळवली जाणार आहे. यासाठी क्रीडा मंत्रालयाने भारतीय अंध संघाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिली आहे.

गृह, परराष्ट्र मंत्रालयाची परवानगीही आवश्यक

भारतीय संघाला मिळालेली क्रीडा मंत्रालयाची मान्यता पुरेशी नाही. भारतीय संघाला पाकिस्तानात जाण्यासाठी गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाचीही परवानगी लागेल. मात्र, अद्यापपर्यंत या दोन्ही मंत्रालयांकडून मंजुरी मिळालेली नाही. क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया (CABI) चे सहाय्यक सचिव शेलेंद्र यादव यांनी सांगितले की, ते सुमारे दोन आठवड्यांपासून सरकारच्या मंजुरीची वाट पाहत आहेत. आम्हाला सरकारकडून फक्त हो किंवा नाही इतकेच उत्तर हवे आहे, असेही ते म्हणाले.

सहाय्यक सचिव म्हणाले की, आम्ही शेवटच्या वेळी २०१४ मध्ये द्विपक्षीय मालिकेसाठी पाकिस्ताना गेला होतो. मात्र, २०१८ मध्ये सरकारने पाकिस्तान दौऱ्याला मान्यता दिली नाही. यानंतर २०२३ मध्ये भारताने या स्पर्धेचे आयोजन केले होते, तेव्हा पाकिस्तानचा संघ येथे आला नव्हता. त्यामुळे यावेळी नेमका काय निर्णय घेतला जाणार याबाबत प्रश्नचिन्हच आहे.

भारतीय संघाने मागील तीन विश्वचषक जिंकले

आतापर्यंत अंध T20 क्रिकेट विश्वचषकाचे तीन हंगाम झाले आहेत आणि या तिन्हींमध्ये भारतीय संघ चॅम्पियन ठरला आहे. हे तीन सीझन २०१२, २०१७ आणि २०२२ मध्ये झाले. गेल्या वेळी २०२२ च्या मोसमात अंतिम फेरीत भारताने बांगलादेशचा १२० धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले होते. हा विजेतेपदाचा सामना बेंगळुरू येथे झाला. यात भारतीय संघाने बांगलादेशला २७७ धावांचे लक्ष्य देऊन १५७ धावांवर रोखले होते. 

Web Title: Indian blind cricket team gets NOC for Pakistan tour from sports ministry clearance awaited from mea and mha blind t20 world cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.