भारतीय संघाचा स्टार गोलंदाज दीपक चहर ( Deepak Chahar) याची पत्नी जया भारद्वाज ( jaya bhardwaj ) हिच्यासोबत १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या एका माजी अधिकाऱ्याने तिच्यासोबत ही फसवणूक केली आहे. दीपक चहरच्या वडिलांनी माजी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. हे पैसे एका करारासाठी दिले होते, मात्र पैसे परत मागितल्यावर क्रिकेट असोसिएशनच्या माजी अधिकाऱ्याने शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली.
दीपक चहरचे वडील लोकेंद्र चहर यांनी उत्तर प्रदेशातील आग्रा येथील हरिपर्वत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरनुसार, हैदराबादच्या पारिख स्पोर्ट्समध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारीख स्पोर्ट्सने जयाकडून करारासाठी १० लाख रुपये घेतले होते, जे त्याने परत केले नाहीत. या फर्मचे मालक ध्रुव पारीख आणि कमलेश पारीख यांची एफआयआरमध्ये नावे आहेत.
दीपक चहर यांचे कुटुंब आग्राच्या शाहगंज येथील मान सरोबर कॉलनीत राहते. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये अधिकारी असलेले ध्रुव पारीख आणि कमलेश पारीख यांनी दीपक चहरची पत्नी जयासोबत करार केला होता. डीलनुसार, ७ ऑक्टोबर २०२२ रोजी जयाकडून १० लाख रुपये घेतले होते, परंतु अद्याप ते परत दिले नाहीत. पैशाच्या मागणीसाठी गेलेल्या जयाला शिवीगाळ केली व जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात होत्या.
दीपक चहर इंडियन प्रीमियर लीगच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा एक भाग आहे. विश्वविजेता कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील या संघाने त्याला १४ कोटी रुपयांमध्ये संघात पुन्हा सामील करून घेतले.दीपक चाहनं गेल्या वर्षी आयपीएलच्या सामन्यादरम्यान स्टेडिअममध्ये जयाला प्रपोज केलं होतं. यापूर्वी ते अनेक वर्ष एमेकांना डेट करत होते. आयपीएलच्या सामन्यांदरम्यान अनेकदा जया दीपक चाहरला सपोर्ट करतानाही दिसत होती. जया भारद्वाज कॉर्पोरेटमध्ये कार्यरत आहे. तिनं मुंबई विद्यापीठातून आपलं शिक्षण घेतलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Indian bowler Deepak Chahar’s wife jaya bhardwaj cheated of 10 lakhs, abused and threatened to kill
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.