भारतीय संघाचा स्टार गोलंदाज दीपक चहर ( Deepak Chahar) याची पत्नी जया भारद्वाज ( jaya bhardwaj ) हिच्यासोबत १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या एका माजी अधिकाऱ्याने तिच्यासोबत ही फसवणूक केली आहे. दीपक चहरच्या वडिलांनी माजी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. हे पैसे एका करारासाठी दिले होते, मात्र पैसे परत मागितल्यावर क्रिकेट असोसिएशनच्या माजी अधिकाऱ्याने शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली.
दीपक चहरचे वडील लोकेंद्र चहर यांनी उत्तर प्रदेशातील आग्रा येथील हरिपर्वत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरनुसार, हैदराबादच्या पारिख स्पोर्ट्समध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारीख स्पोर्ट्सने जयाकडून करारासाठी १० लाख रुपये घेतले होते, जे त्याने परत केले नाहीत. या फर्मचे मालक ध्रुव पारीख आणि कमलेश पारीख यांची एफआयआरमध्ये नावे आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"