जसप्रीत बुमराह दिवसाला ७ षटकं टाकतोय, पण पुनरागमनावर अजूनही संभ्रम

जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह व श्रेयस अय्यर दुखापतीतून सावरले आहेत, असे वाटत आहे. पण, त्यांना अद्याप पूर्ण तंदुरूस्ती मिळवता आलेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 05:12 PM2023-06-28T17:12:03+5:302023-06-28T17:12:28+5:30

whatsapp join usJoin us
Indian Bowler Jasprit Bumrah bowling 7 overs a day at NCA, still IND vs IRE comeback doubtful | जसप्रीत बुमराह दिवसाला ७ षटकं टाकतोय, पण पुनरागमनावर अजूनही संभ्रम

जसप्रीत बुमराह दिवसाला ७ षटकं टाकतोय, पण पुनरागमनावर अजूनही संभ्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले... त्यापूर्वी कुठे वन डे सामने खेळाचे हेही ठरलेय.. पण, भारताचे अजूनही काही प्रमुख खेळाडू दुखापतीतून नाही सावरले... भयंकर अपघातातून बचावलेला रिषभ पंतचे वर्ल्ड कपमध्ये खेळणे अशक्यच आहे.. जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह व श्रेयस अय्यर दुखापतीतून सावरले आहेत, असे वाटत आहे. पण, त्यांना अद्याप पूर्ण तंदुरूस्ती मिळवता आलेली नाही. बराच काळ क्रिकेटपासून दूर असलेला जसप्रीत बुमराह पुन्हा मैदानावर उतरण्यासाठी आतुर आहे आणि त्याने बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) सरावालाही सुरूवात केली आहे. सध्या हाती आलेल्या वृत्तानुसार बुमराहने गोलंदाजीला सुरुवात केली असून तो दिवसाला ७ षटकं टाकतोय... पण, तो आयर्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-० मालिकेतील त्याच्या पुनरागमनावरही प्रश्नचिन्ह आहे.


त्याचे पुनरागमन हे सरावावर आणि वर्क लोड मॅनेजमेंटवर अवलंबून आहे. बीसीसीआयने जसप्रीतला आशिया चषक आणि वर्ल्ड कप खेळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. “या स्वरूपाच्या दुखापतीसाठी सतत देखरेख आवश्यक असल्याने कोणतीही टाइमलाइन सेट करणे शहाणपणाचे ठरणा नाही. पण असे म्हणता येईल की बुमराहची तब्येत चांगली आहे आणि त्याने NCA नेटवर सात षटके टाकली आहेत. सुरुवातीच्या काळात हलक्या वर्कआउट्स आणि बॉलिंग सेशनमधून त्याच्या वर्कलोडमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तो पुढील महिन्यात काही सराव सामने (NCA मध्ये) खेळणार आहे आणि त्यानंतर त्याच्या फिटनेसचे बारकाईने मूल्यांकन केले जाईल,” असे सूत्रांनी पीटीआयला सांगितले. 

 

  • जुलै २०२२ - इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात जसप्रीतच्या पाठीच्या दुखण्याचे डोकं वर काढले आणि तो तिसऱ्या कसोटीत खेळला नाही. २०१९साली त्याला झालेल्या दुखापतीने पुन्हा त्रास देण्यास सुरूवात केली होती.
  • ऑगस्ट २०२२ - वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेलाही तो मुकला अन् NCA मध्ये दाखल झाला. आशिया चषक स्पर्धेपूर्वी तो पूर्णपणे बरा होऊ शकला नाही. 
  • सप्टेंबर २०२२ - दोन-अडीच महिन्यानंतर जसप्रीतला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळवण्याची घाई केली गेली. त्याने दोन कसोटीत केवळ सहा षटकं फेकली अन् त्याची दुखापत बळावली.
  • ऑक्टोबर २०२२- जसप्रीतला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला मुकावे लागले आणि त्यापाठोपाठ न्यूझीलंड ( नोव्हेंबर) आणि बांगलादेश ( डिसेंबर) दौऱ्यावरही तो जाऊ शकला नाही.  
  • जानेवारी २०२३ - श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी त्याचे नाव संघात निवडले गेले, परंतु त्याने पुन्हा दुखापतीमुळे माघार घेतली. त्यानंतर तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ( फेब्रुवारी), आयपीएल ( मार्च) मध्ये खेळला नाही आणि न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रियेसाठी गेला.
  • जून २०२३- त्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधून माघार घेतली. 

Web Title: Indian Bowler Jasprit Bumrah bowling 7 overs a day at NCA, still IND vs IRE comeback doubtful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.