भारतीय गोलंदाजी मुख्य ‘ट्रॅकवर’

पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात जसप्रित बुमराहने जादुई गोलंदाजी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 07:03 AM2019-09-01T07:03:27+5:302019-09-01T07:03:55+5:30

whatsapp join usJoin us
Indian bowling major 'on track', team india | भारतीय गोलंदाजी मुख्य ‘ट्रॅकवर’

भारतीय गोलंदाजी मुख्य ‘ट्रॅकवर’

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अयाझ मेमन

पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात जसप्रित बुमराहने जादुई गोलंदाजी केली. त्याच्या या कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटमध्ये नाट्यमय असे रूप पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यात केवळ बुमराह हाच चमकला नाही, तर ईशांत शमार्ने सुद्धा पाच बळी घेतले आणि मोहम्मद शमीने सुद्धा दोन बळी घेत डाव गाजवला. असे प्रदर्शन किंवा अशा घटना भारतीय गोलंदाजीला उच्च स्तरावर नेतात. गेल्या १८-२० महिन्यांपासून या तिन्ही गोलंदाजांनी सातत्यपूर्ण यश मिळवले असून विश्वात भारतीय क्रिकेटने आपल्या प्रोफाइलवर बराच प्रभाव पाडला आहे.

भारताला यश मिळवून देण्यात आता फिरकी नव्हे तर जलदगती गोलंदाज पुढे येत आहेत. गोलंदाजीतील हा बदल भारताला नंबर वन क्रमांकावर कायम ठेवण्यात महत्त्वपूर्ण ठरत आहे. बुमराह, ईशांत आणि शमीला भारतीय फलंदाजांचीही मदत मिळत आहे. २०१८ च्या दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौºयापासून पाच दिवसीय क्रिकेटमध्ये भारताने मानांकनात आघाडीच घेतली आहे. विशेष म्हणजे, भारताची बेंच स्ट्रेन्थही चांगली आहे. तिघांपैकी कुणाला दुखापत झाल्यास उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमार हे उत्कृष्टपणे मोहीम पुढे चालू ठेवतात. काही उदयोन्मुख खेळाडू सुद्धा आहेत. ज्यात नवदीप सैनी, मोहम्मद सिराज आणि खलील अहमद यांचा समावेश आहे. देशाच्या कानाकोपºयातून सध्या वेगवान गोलंदाज पुढे येत आहेत. त्यामुळे निवडकर्त्यांपुढेही आता बरेच पर्याय उपलब्ध झाले आहेत.
 

(लेखक लोकमतमध्ये कन्सल्टिंग एडिटर आहेत)

Web Title: Indian bowling major 'on track', team india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.