अंडर-19 क्रिकेट विश्वचषक 2022 (U-19 Men's Cricket World Cup 2022) साठी ऑस्ट्रेलियन संघाने आपला अंडर-19 संघ जाहीर केला आहे. या संघात ऑस्ट्रेलियाने एका भारतीय खेळाडूला संधी दिली आहे. तामिळनाडूत जन्मलेल्या भारतीय वंशाच्या निवेथन राधाकृष्णनला ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 संघात संधी देण्यात आली आहे.
राधाकृष्णन यांने भारतात राहून तामिळनाडू प्रीमियर लीग आणि अनेक देशांतर्गत क्रिकेट सामनेही खेळले आहेत. आयपीएल 2021 दरम्यान, राधाकृष्णन याला दिल्ली कॅपिटल्सने त्याच्या संघासोबत नेट गोलंदाज म्हणून ठेवले होते. पण, आता त्याची ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 क्रिकेट संघात निवड झाली आहे.
दोन्ही हातांने गोलंदाजी करतो
निवेथन राधाकृष्णनची खासियत म्हणजे, तो दोन्ही हातांनी गोलंदाजी करू शकतो. काही दिवसांपूर्वी ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले होते की, आतापर्यंत दोन्ही हातांनी गोलंदाजी करणारा कोणताही खेळाडू नव्हता. म्हणूनच मी दोन्ही हातांनी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. खूप प्रॅक्टीस केल्यानंतर मला दोन्ही हातांनी बॉलिंग करता आली.
भारतीय वंशाचा ऑस्ट्रेलियन
2013 मध्येच निवेथनचे संपूर्ण कुटुंब ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले होते. तिथे पोहोचल्यानंतर राधाकृष्णनने सिडनीतील क्रिकेट अकादमीत प्रवेश घेतला. नंतर त्याची ऑस्ट्रेलियाच्या 16 वर्षाखालील संघात निवड झाली. 2019 मध्ये राधाकृष्णनची पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या 16 वर्षाखालील संघात निवड झाली होती. त्याने मिळालेल्या संधीचा पुरेपूर वापर करुन आपली क्षमता दाखवून दिली. या अष्टपैलू खेळाडूने पाच सामन्यांच्या मालिकेत 172 धावा केल्या आणि 8 बळी घेतले होते.
19 वर्षाखालील विश्वचषक 2022 साठी ऑस्ट्रेलियाचा संघ
हरकिरत बाजवा, अॅडन काहिल, कूपर कॉनोली, जोशुआ गार्नर, आयझॅक हिगिन्स, कॅम्पबेल केलवे, कोरी मिलर, जॅक निस्बेट, निवेथन राधाकृष्णन, विल्यम साल्झमन, लचलान शॉ, जॅक्सन सेनफेल्ड, टोबियास स्नेल, टॉम व्हिटनी, टीग वायली.
Web Title: Indian boy selected in Australia's under 19 world cup team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.