rohit sharma on mohammad shami । अहमदाबाद: भारतीय संघाने सलग चौथ्यांदा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची मालिका आपल्या नावावर केली आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील 2 सामने जिंकून यजमान भारताने 2-1 ने मालिकेवर कब्जा केला. 3 सामन्यांमधील 2 सामन्यांत यजमान भारताने तर एका सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने विजय मिळवला. काल झालेला अखेरचा सामना अनिर्णित झाल्याने भारताच्या मालिका विजयावर शिक्कामोर्तब झाला. मात्र, अहमदाबाद येथे झालेल्या चौथ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा शेवट एका वादंगाने झाला होता.
दरम्यान, चौथ्या कसोटीचा दुसरा दिवस संपल्यानंतर भारतीय खेळाडू डग आऊटच्या दिशेने जात असताना काही चाहते मोहम्मद शमीला पाहून मुद्दाम 'जय श्री राम' चे नारे देताना दिसले. यावेळी सूर्यकुमार यादवने मात्र हात जोडून हवेत उंचावले अन् चाहत्यांना उत्तर दिले. या पूर्वी देखील शमी, मोहम्मद सिराज यांनी टीळा न लावल्यावरून त्यांना ट्रोल केले होते, पण त्या व्हिडीओत या दोघांसह भारताच्या अन्य सदस्यांनीही टीळा लावला नव्हता आणि जाणीवपूर्वक त्यांना वगळले गेले होते.
या मुद्द्यांवरून बरेच राजकारण तापले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जिंतेद्र आव्हाड यांनी यावर टीका केली होती. अशातच आता भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने देखील याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. चौथा कसोटी सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्माला याबाबत प्रश्न विचारला असता, त्याने मला याबाबत अजिबात माहिती नसल्याचे सांगितले. "मोहम्मद शमीसमोर जय श्री रामचे नारे देण्यात आले याबाबत मला कल्पना नव्हती. याबद्दल मी प्रथमच ऐकत आहे. तिथे काय झाले ते मला माहीत नाही", अशा शब्दांत रोहितने या प्रकरणावर अधिक बोलणे टाळले. खरं तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत मोहम्मद शमीची कामगिरी चांगली होती. त्याने तीन सामन्यात 28.22 च्या सरासरीने 9 बळी घेत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"