पाकिस्तानचा सर्वात घातक गोलंदाज कोण? रोहितच्या उत्तरानं पत्नी रितीकाला हसू अनावर

Rohit Sharma : भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून तिथे ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 12:47 PM2023-08-08T12:47:34+5:302023-08-08T12:48:07+5:30

whatsapp join usJoin us
 Indian captain Rohit Sharma's answer when asked who is the hardest bowler in the Pakistan team made his wife Ritika Sajdeh laugh too  | पाकिस्तानचा सर्वात घातक गोलंदाज कोण? रोहितच्या उत्तरानं पत्नी रितीकाला हसू अनावर

पाकिस्तानचा सर्वात घातक गोलंदाज कोण? रोहितच्या उत्तरानं पत्नी रितीकाला हसू अनावर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rohit Sharma's Funny Answer : भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून तिथे ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. ट्वेंटी-२० मालिकेत काही युवा खेळाडूंना संधी मिळाली असून वरिष्ठांना विश्रांती देण्यात आली आहे. संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. रोहित सध्या अमेरिकेत असून तेथील एका कार्यक्रमात बोलताना त्याने वन डे विश्वचषक २०२३ बद्दल विविध मुद्द्यांवर भाष्य केले. अशातच रोहितने एका प्रश्नाचे उत्तर देताने जे काही म्हटले ते पाहून त्याची पत्नी रितीकाला देखील हसू अनावर झाले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

रोहितच्या उत्तरानं पिकला हशा 
आपल्या विनोदी शैलीसाठी रोहितला ओळखले जाते. यावेळी देखील असेच काहीसे पाहायला मिळाले. खरं तर रोहितला पाकिस्तानी संघातील सर्वात घातक गोलंदाज गोलंदाज कोण असे विचारले असता त्याने पत्रकाराला पुन्हा तोच प्रश्न विचारला. मग भारतीय कर्णधाराने उत्तर देताना म्हटले, "सगळेच चांगले गोलंदाज आहेत यार... नाव घेतल्यावर मोठा वाद होतो. एकाचे नाव घेतले तर दुसऱ्याला वाईट वाटेल, त्यामुळे सगळेच खेळाडू चांगले आहेत." रोहितचे हे उत्तर ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. कार्यक्रमाला उपस्थित असलेली रोहितची पत्नी रितीका सजदेह हिला देखील हसू अनावर झाले. 

भारतीय संघ आगामी काळात आशिया चषक आणि वन डे विश्वचषकात पाकिस्तानशी भिडणार आहे. २ सप्टेंबर रोजी आशिया चषकात आणि १५ ऑक्टोबर रोजी विश्वचषकात हे कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने असतील. 

आशिया चषकाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे - 
३० ऑगस्ट - पाकिस्तान विरूद्ध नेपाळ, मुल्तान
३१ ऑगस्ट - बांगलादेश विरूद्ध श्रीलंका, कँडी
२ सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध भारत, कँडी
३ सप्टेंबर - बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
४ सप्टेंबर - भारत विरूद्ध नेपाळ, कँडी
५ सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर
९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी
१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी
१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला
१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला
१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला
१७ सप्टेंबर - फायनल

विश्वचषकातील भारताचे सामने - 

  1. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ८ ऑक्टोबर, चेन्नई
  2. भारत विरुद्ध अफगाणिस्तान,११ ऑक्टोबर, दिल्ली
  3. भारत विरुद्ध पाकिस्तान, १५ ऑक्टोबर, अहमदाबाद
  4. भारत विरुद्ध बांगलादेश, १९ ऑक्टोबर, पुणे
  5. भारत विरुद्ध न्यूझीलंड, २२ ऑक्टोबर, धर्मशाला
  6. भारत विरुद्ध इंग्लंड, २९ ऑक्टोबर, लखनौ
  7. भारत विरुद्ध क्वालिफायर, २ नोव्हेंबर, मुंबई
  8. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ५ नोव्हेंबर, कोलकाता
  9. भारत विरुद्ध क्वालिफायर, ११ नोव्हेंबर, बंगळुरू  

 

Web Title:  Indian captain Rohit Sharma's answer when asked who is the hardest bowler in the Pakistan team made his wife Ritika Sajdeh laugh too 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.