टी-२० फलंदाजीच्या आयसीसी क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहली ‘टॉप’वरच

आयसीसी ताज्या मानांकन यादीत भारतीय कर्णधार टी-२० फलंदाजीत अव्वल स्थानी, तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराह दुस-या क्रमांकावर आहे. आॅस्ट्रेलियाच्या अ‍ॅरॉन फिंच याच्यामागून ३९ गुणांनी प्रगती करीत कोहलीने आघाडी घेतली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 01:29 AM2017-09-18T01:29:26+5:302017-09-18T01:29:37+5:30

whatsapp join usJoin us
Indian captain Virat Kohli is on top of the T20 batting rankings | टी-२० फलंदाजीच्या आयसीसी क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहली ‘टॉप’वरच

टी-२० फलंदाजीच्या आयसीसी क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहली ‘टॉप’वरच

whatsapp join usJoin usgoogleNewsNext


दुबई : आयसीसी ताज्या मानांकन यादीत भारतीय कर्णधार टी-२० फलंदाजीत अव्वल स्थानी, तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराह दुस-या क्रमांकावर आहे. आॅस्ट्रेलियाच्या अ‍ॅरॉन फिंच याच्यामागून ३९ गुणांनी प्रगती करीत कोहलीने आघाडी घेतली आहे. फिंच दुस-या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजच्या लुईस याने सर्वाेत्कृष्ट गुणांसह तिसरे स्थान प्राप्त केले.
गोलंदाजीत, बुमराह याने दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहिर याला मागे टाकत दुसरे स्थान मिळवले. या गटात पाकिस्तानचा इमाद वसीम अव्वल स्थानी आहे. भारताचा स्टार आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन दहाव्या स्थानी कायम आहे. वेस्ट इंडिजने चेस्टर ली स्ट्रीटमध्ये इंग्लंडचा २१ धावांनी पराभव केल्याने भारतीय संघ पाचव्या क्रमांकावर कायम आहे. विजयाचा वेस्ट इंडिजला फायदा झाला. ते ११७ गुणांसह ते चौथ्या क्रमांकावर होते आता ते १२० गुणांसह तिस-या क्रमांकावर पोहोचले आहेत.

Web Title: Indian captain Virat Kohli is on top of the T20 batting rankings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.