Indian captains in 2022 : BCCI ने भारतीय संघामध्ये कर्णधारांची भरवलीय 'जत्रा'; १० महिन्यांत ८ जणांकडे सोपवलं नेतृत्व!

Indian captains in 2022 : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विराट कोहलीने कर्णधारपद सोडले.. त्यानंतर BCCI ने वन डे संघाचे नेतृत्व त्याच्याकडून काढून घेतले आणि या दोन्ही संघांची जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर सोपवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 04:41 PM2022-07-06T16:41:55+5:302022-07-06T16:43:01+5:30

whatsapp join usJoin us
Indian captains in 2022: 8 different captains across all three formats for India in the last ten months | Indian captains in 2022 : BCCI ने भारतीय संघामध्ये कर्णधारांची भरवलीय 'जत्रा'; १० महिन्यांत ८ जणांकडे सोपवलं नेतृत्व!

Indian captains in 2022 : BCCI ने भारतीय संघामध्ये कर्णधारांची भरवलीय 'जत्रा'; १० महिन्यांत ८ जणांकडे सोपवलं नेतृत्व!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian captains in 2022 : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विराट कोहलीने कर्णधारपद सोडले.. त्यानंतर BCCI ने वन डे संघाचे नेतृत्व त्याच्याकडून काढून घेतले आणि या दोन्ही संघांची जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर सोपवली. नाराज असलेल्या विराटने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर अचानक कसोटी क्रिकेटचेही कर्णधारपद सोडले आणि आता रोहित शर्मा तीनही फॉरमॅटचा कर्णधार झाला. पण, दुखापत, तंदुरुस्ती, कोरोना या ना त्या कारणाने रोहितला त्यानंतरची प्रत्येक मालिका खेळता आली नाही आणि ट्वेंटी-२०वर्ल्ड कपच्या वर्षात संघ व्यवस्थापन कर्णधार- कर्णधार असा खेळ खेळताना दिसत आहेत. मागील १० महिन्यांत ८ खेळाडूंनी भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबादारी सांभाळली आहे... 

BCCI ने आज आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी वन डे संघ जाहीर केला आणि त्यात शिखर धवनकडे ( Shikhar Dhawan) नेतृत्व सोपवण्यात आले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद सोडणाऱ्या रवींद्र जडेजाकडे या मालिकेत उप कर्णधारपदाची जबाबदारी असेल.  विराट कोहली,  जसप्रीत बुमराह, रिषभ पंत व रोहित शर्मा यांना वन डे मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. नुकताच भारतीय संघात पुनरागमन करणारा आणि आयर्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत नेतृत्व सांभाळणाऱ्या हार्दिक पांड्यालाही विश्रांती दिली गेली आहे. संजू सॅमसन, शुबमन गिल, अर्षदीप सिंग व आवेश खान यांना वन डे संघात पदार्पणाची संधी मिळाली आहे.
 
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी भारताचा संघ - शिखऱ धवन ( कर्णधार), रवींद्र जडेजा ( उप कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन ( यष्टिरक्षक), संजू सॅमसन ( यष्टिरक्षक), शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्षदीप सिंग ( Team India ODI squad for West Indies series  - Shikhar Dhawan (C), Ravindra Jadeja (VC), Ruturaj Gaikwad, Shubman Gill, Deepak Hooda, Suryakumar Yadav, Shreyas Iyer, Ishan Kishan (WK), Sanju Samson (WK), Shardul Thakur, Yuzvendra Chahal, Axar Patel, Avesh Khan, Prasidh Krishna, Mohd Siraj, Arshdeep Singh) 


 

२०२२ मध्ये भारतीय सघाचे कर्णधार ( Indian captains in 2022) 

  • दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका - विराट कोहली
  • दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे मालिका - लोकेश राहुल 
  • श्रीलंका व वेस्ट इंडिज यांच्याविरुद्धची मालिका - रोहित शर्मा
  • दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका - रिषभ पंत
  • आयर्लंडविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका - हार्दिक पांड्या
  • इंग्लंडविरुद्ध पाचवी कसोटी - जसप्रीत बुमराह
  • दोन ट्वेंटी-२० सराव सामने - दिनेश कार्तिक
  • इंग्लंडविरुद्धची वन डे व ट्वेंटी-२० मालिका - रोहित शर्मा
  • वेस्ट इंडिजविरुद्धची वन डे मालिका - शिखर धवन 

Web Title: Indian captains in 2022: 8 different captains across all three formats for India in the last ten months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.