नागपूर: आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगला मागे टाकत भारतीय कर्णधार विराट कोहली याने दमदार कामगिरीचा आणखी एक विक्रम स्वत:च्या शिरपेचात रोवला आहे. व्हीसीएच्या जामठा स्टेडियमवर दुसऱ्या वन डेत मंगळवारी भारतीय फलंदाज आॅस्ट्रेलियन गोलंदाजीसमोर कोलमडले. रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, धोनी हे ठरावीक अंतराने माघारी परतले. मात्र विराट कोहलीने विजय शंकरच्या साथीने संघाची बाजू सावरुन धावसंख्येला आकार दिला. विराटने एकाकी झुंज देत १२० चेंडू दहा चौकारांससह ११६ धावा ठोकल्या. या खेळीदरम्यान त्याने ४० वे वन डे शतकदेखील झळकविले.>विराटने मोडला सचिनचा विक्रमभारताचा कर्णधार विराट कोहली याने मंगळवारी आॅस्ट्रेलिया विरोधात आपल्या कारकिर्दीतील ४० वे शतक झळकावले.त्याने ही कामगिरी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर पेक्षा १३९ कमी डाव खेळून केली. विराट याने ४० वे शतक २१६ व्या डावात केले. तर सचिनने ४० वे शतक ३५५ डावात केले होते.>कोहलीने ठोकले १००० चौकार कामगिरी करणारा चौथा भारतीयविराट कोहली याने दुसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या दरम्यान १००० वा चौकार लगावला. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय आणि एकुण १२ वा फलंदाज ठरला. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, विरेंद्र सेहवाग यांनी ही कामगिरी केली होती. सचिन याने सर्वाधिक २०१६ चौकार लगावले आहेत.>९ वर्षांनंतर महेंद्र सिंह धोनी पहिल्यांदाच शुन्यावर बादभारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी ९ वर्षांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच शुन्यावर बाद झाला आहे. आपल्या सोनेरी कारकिर्दीत त्याच्यावर २०१० नंतर ही वेळ पहिल्यांदा ओढावली. अॅडम झाम्पाच्या गोलंदाजीवर उस्मान ख्वाजा याने धोनीचा झेल घेतला. धोनी या आधी आपल्या पर्दापणाच्या सामन्यात बांगलादेश विरोधात २००४ मध्ये शुन्यावर बाद झाला होता. त्यानंतर २००५ मध्ये श्रीलंके विरोधात तर २००७ मध्ये पुन्हा श्रीलंकेविरोधात तो शुन्यावर बाद झाला होता. २०१० मध्ये आॅस्ट्रेलियविरोधातच धोनीला भोपळाही फोडता आला नव्हता. आता पुन्हा एकदा धोनीला आॅस्ट्रेलियाविरोधातच भोपळाही फोडता आला नाही.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- भारतीय कर्णधाराची ‘विराट’ कामगिरी
भारतीय कर्णधाराची ‘विराट’ कामगिरी
आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगला मागे टाकत भारतीय कर्णधार विराट कोहली याने दमदार कामगिरीचा आणखी एक विक्रम स्वत:च्या शिरपेचात रोवला आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 4:32 AM