ऑकलंड : भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये दाखल झाला आहे. आता २४ जानेवारीला पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यापासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. पण न्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावर भारतीय संघाने पार्टी करायला सुरुवात केली आहे. या पार्टीचे खास फोटो तुम्ही पाहू शकता...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) मंगळवारी न्यूझीलंड दौऱ्याकरीता वन डे संघाची घोषणा केली. शिखर धवननं दुखापतीमुळे माघार घेतल्यानंतर त्याच्या जागी कोणाला संधी मिळेल, याची सर्वांना उत्सुकता होती. बीसीसीआयनं धवनच्या जागी ट्वेंटी-20 मालिकेत संजू सॅमसनला संधी दिली आहे. संजू सध्या भारत अ संघाबरोबर न्यूझीलंड दौऱ्यावरच आहे. पाच ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिका या दौऱ्यावर खेळल्या जाणार आहेत. यापैकी ट्वेंटी-20 मालिकेसाठी बीसीसीआयनं संघ आधीच जाहीर केला होता, परंतु मंगळवारी वन डे संघही जाहीर केला.
मंगळवारी रात्री भारतीय संघ न्यूझीलंडला रवाना झाला. त्यानंतर बुधवारी भारतीय संघाने पार्टी केल्याचे पाहायला मिळाले. या पार्टीमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा आणि मनीष पांडे दिसत आहेत. त्याचबरोबर जसप्रीत बुमरा आणि श्रेयस अय्यरने काही फोटो शेअर केले आहेत.
बीसीसीआयनं तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी जाहीर केलेल्या टीम इंडियात पृथ्वी शॉला संधी देण्यात आली आहे. धवनच्या माघारीमुळे पृथ्वीला वन डे पदार्पणाची संधी मिळाली आहे. भारताच्या वन डे संघात मुंबईचे पाच खेळाडूंचा समावेश आहे. रोहित, पृथ्वी, शिवम, श्रेयस आणि शार्दूल असे पाच मुंबईकर टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
भारताचा वन डे संघ - विराट कोहली ( कर्णधार), रोहित शर्मा ( उपकर्णधार), पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत ( यष्टिरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, केदार जाधव.
वन डे
भारत विरुद्ध न्यूझीलंड - 5 फेब्रुवारी, सकाळी 7.30 वा.
भारत विरुद्ध न्यूझीलंड - 8 फेब्रुवारी, सकाळी 7.30 वा.
भारत विरुद्ध न्यूझीलंड - 11 फेब्रुवारी, सकाळी 7.30 वा.
Web Title: Indian cricket done Party in New Zealand, photos are viral ...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.